आताची सर्वात मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Rupali Chakankar Ashok Kharat case
Rupali Chakankar Ashok Kharat caseSaaam tv
Published On
Summary

रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय

वैयक्तिक कारणातून राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी सांगितले

त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

राज्याच्या राजकारणात मोठी बातमी हाती आली आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अशोक खरात प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. अशोक खरातच्या अश्लील कृत्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या भोंदूबाबाचे कौतुक करणारे रुपाली चाकरणरांच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यांचे भोंदूबाबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.

Rupali Chakankar Ashok Kharat case
CMOकडून राजीनाम्याचे निर्देश येताच रुपाली चाकणकरांची सोशल मीडियावर पोस्ट; राजकीय वर्तुळात खळबळ

या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाने रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर आज शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला.

Rupali Chakankar Ashok Kharat case
भाजपने डाव टाकला, ममता बॅनर्जी चक्रव्यूहात अडकल्या? नेमकं काय घडलं?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे फोटो समोर आल्याने त्यांच्यावर राजकारणात टीकेची झोड उठवली जात होती. रुपाली चाकणकर यांच्याकडे सकाळपासूनच राजीनाम्याची मागणी केली जात होती. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद कोणाला सोपवलं जाणार, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com