Raigad Fort Road Closed: शिवप्रेमींची निराशा! रायगड किल्ल्यावर जाणारा मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद, काय आहे कारण?

Raigad Police Administration: पायरी मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने (Raigad Police) हा मोठा निर्णय घेतला आहे.
Raigad Fort Road Closed
Raigad Fort Road ClosedSaam Tv
Published On: 

Raigad News: पावसाळ्यामध्ये रायगड किल्ल्यावर (Raigad Fort) ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवप्रेमींसाठी (Shiv Lovers) महत्वाची बातमी आहे. रायगड किल्ल्यावर जाणारी पायवाट बंद करण्यात आली आहे. पायरी मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने (Raigad Police) हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि पर्यटक नाराज झाले आहेत.

Raigad Fort Road Closed
Dead Body Carried In Auto Rickshaw: मृत्यूनंतरही हाल संपेना! रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह रात्रभर रिक्षातून फिरवला, पुण्यातील धक्कादायक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग 31 ऑगस्टपर्यंत पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी बंद राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Raigad Fort Road Closed
Sanjay Raut News: मला धमकी देणारा 'तो' व्यक्ती शिंदे गटाचा; संजय राऊतांचा गंभीर आरोप

रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून ते महादरवाजापर्यंतच्या पायरी मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे आता किल्ल्याच्या दिशेने जाणारा पायी मार्गच बंद राहणार आहे. रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग बंद करण्यात आला असला तरी किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वेची सुविधा सुरु राहणार आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Raigad Fort Road Closed
Onion Price News : महाराष्ट्रात रडवणाऱ्या कांद्याने तेलंगणात हसवलं; मुख्यमंत्री केसीआर शेतकऱ्यांच्या मदतीला

दरम्यान, 13 जून रोजीच रायगड किल्ल्याजवळ दरड कोसळल्याची घटना घडली होती. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर ही भली मोठी दरड कोसळली होती. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. रायगड किल्ल्याजवळील चित्त दरवाजाजवळ ही दरड कोसळली होती. यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले होते. तर काही दिवसांपूर्वी किल्ले रायगडवर दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com