Onion Purchase
Onion PurchaseSaam tv

Onion Price News : महाराष्ट्रात रडवणाऱ्या कांद्याने तेलंगणात हसवलं; मुख्यमंत्री केसीआर शेतकऱ्यांच्या मदतीला

Telangana onion Price : सरासरी 1200 रुपये हातात पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्रात कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातल्या कांद्यावर नांगर, जेसीबी फिरवला. ज्यांच्याकडे काढलेला कांदा आहे, त्यांना 100 ते 200 रुपयांच्या मातीमोल भावानं कांदा विकावा लागत आहे. मात्र त्याच कांद्याला तेलंगणामध्ये तब्बल 1800 रुपयाचा भाव मिळतोय.

मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी BRSच्या मदतीने तेलंगणाचं मार्केट गाठून आपला कांदा विकला आहे. सध्या महाराष्ट्रातल्या क्विंटलभर कांद्याला 100-200 रुपये भाव मिळत असताना, हाच कांदा तेलंगाणामध्ये सरासरी 1800 रुपये दराने खरेदी केला.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू

भाव पडल्यामुळे आपल्याकडे डोळ्यात पाणी आणणाऱ्या त्याचे कांद्याने वाहतूक खर्च, अडत, हमाली वजा जाता सरासरी 1200 रुपये हातात पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. (Breaking News)

Onion Purchase
Ajit Pawar News : 'शासन आपल्या दारी' उपक्रमावर प्रचंड खर्च, पण नागरिकांना फायदा होतोय? अजित पवारांकडून प्रश्न उपस्थित

बीआरएसच्या स्थानिक नेत्यांची मदत

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीआरएसच्या स्थानिक नेत्यांना सूचना केली होती. त्यानुसार मागच्या आठवड्यात कन्नडमधून 6 ट्रक तेलंगणाकडे रवाना झाले होते. आता आणखी 20-25 ट्रक माल जात आहे. (Latest Marathi News)

Onion Purchase
Sanjay Raut News: मला धमकी देणारा 'तो' व्यक्ती शिंदे गटाचा; संजय राऊतांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रापेक्षा तेलंगणामध्ये चांगला भाव मिळाल्याने, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोडसह नाशिक, येवला, दौंड आदी भागातूनही तेलंगणात कांदा पाठविण्यासाठी शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. कांद्याचा दर्जा व गुणवत्तेनुसार भाव मिळत आहे. बारदानाही मोफत आहे, वाहतूक भाडे व इतर खर्च वजा जाता उर्वरित पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com