Ajit Pawar News : 'शासन आपल्या दारी' उपक्रमावर प्रचंड खर्च, पण नागरिकांना फायदा होतोय? अजित पवारांकडून प्रश्न उपस्थित

Political news : सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newssaam tv
Published On

Jalgaon News : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शासन आपल्या दारी या सरकारच्या उपक्रमावरही अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर प्रचंड खर्च केला जात आहे. मात्र या कार्यक्रमांचा लोकांना खरंच फायदा होत आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हे सगळं घडतंय

राज्यातील राजकारणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आज निव्वळ राजकारण चाललं आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही. विरोधकांना साईड ट्रॅक केलं जात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हे सगळं घडत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (Breaking News)

Ajit Pawar News
Mumbai Crime News : पत्नीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला अटक; संशयाचं भूत डोक्यात शिरल्याने कृत्य

राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात

सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. जातीय तणाव निर्माण होत आहेत. दोन ते तीन महिन्यात दहा ते बारा घटना घडल्या आहेत. मी कोणत्याही घटनेचे समर्थन करणार नाही. महाराष्ट्र पुरोगामी विचारधारेचा आहे, असंही अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महागाई, शेती मालाला भाव नाही यावरून लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे चाललंय का? सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. सरकार 20 जणांचं आहे, कमी मंत्र्यांमध्ये काम सुरू आहे. एकाच मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार आहे, त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

Ajit Pawar News
Saamana Editorial on Devendra Fadnavis: काडतूस काय किंवा फडतूस काय, तुम्ही बिनकामाचे आहात हेच सत्य; सामनातून भाजप-फडणवीसांवर हल्लाबोल

पोलीस खात्यात राजकीय हस्तक्षेप वाढता

पोलीस खात्यात नको तेव्हढा राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. कृषी विभाग कारवाईचा आव आणत आहे. यामध्ये मंत्र्यांचे पीए अडकले आहेत. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. आमच्या सरकारमध्ये असं कधीही घडलं नाही.

सरकार टिकवण्यासाठी आमदार सांगतील ती गोष्ट, मग ती नियमात असेल किंवा नाही काही बघितलं जात नाही. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस नाही. जे दिसतंय ते अत्यंत चिंताजनक आहे, असंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com