Saamana Editorial on Devendra Fadnavis: काडतूस काय किंवा फडतूस काय, तुम्ही बिनकामाचे आहात हेच सत्य; सामनातून भाजप-फडणवीसांवर हल्लाबोल

Saamana Editorial News : महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्यांना फडतूस नाही म्हणायचे तर काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
Uddhav Thackeray And Devendra Fadnavis
Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Saam Tv

Mumbai News : उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'फडतूस' म्हणत केलेल्या टीकेवरुन राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे आणि भाजपचे नेते एकमेकांवर टीकास्र सोडत आहेत. आता शिवसेनेचं (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामनातूनही राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस आणि मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्राला नपुंसक बनवणाऱ्यांना फडतूस नाही म्हणायचे तर काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

शिवसेनेचा धनुष्यबाण भ्रष्ट मार्गाने काढून घेतला तरी बाण आरपार घुसलाच . आता तो कोणत्या भागात घुसला ते श्रीमान ' बावन ' आण्यांनीच जाहीर करावे . काडतूस काय किंवा फडतूस काय , तुम्ही बिनकामाचे आहात . हेच सत्य आहे, अशा शब्दात सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis
Durga Bhosle-Shinde News : युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; ठाण्यातील कालच्या मोर्चात होत्या सहभागी

'फडतूस' शब्दांचा अर्थ या 'बावन' आण्यांनी समजून घ्यावा

महाराष्ट्रावर एक फडतूस सरकार राज्य करीत आहे. राज्य सरकार किंवा ते चालवणारे फडतूस आहेत असे फक्त लोकांनाच वाटत नाही, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयासही वाटते. महाराष्ट्राचे सरकार 'नपुंसक' आहे म्हणजेच बिनकामाचे आहे, असे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, तर मग भाजपच्या चवन्न्या आणि 'बावन' आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? 'नपुंसक' किंवा 'फडतूस' शब्दांचा अर्थ या 'बावन' आण्यांनी समजून घेतला पाहिजे.

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis
Sushma Andhare News: 'फडणवीस काडतूस तर ठाकरी बाणा म्हणजे तोफ...' ठाण्याच्या सभेतून सुषमा अंधारे कडाडल्या; बावनकुळेंना दिले थेट आव्हान

भिजलेल्या काडतुसांना शेतकऱ्यांची चिंता नाही

भिजलेल्या काडतुसांना संगीता डवरेंचे काय झाले याची माहिती होती काय? मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पत्नी संगीता डवरे यांची अखेर मृत्यूशी झुंज मंगळवारी संपली. भिजलेल्या काडतुसाला आपण गृहमंत्री असल्याचा सार्थ अभिमान आहे. पण स्वपक्षीय बावनकुळे व डोम कावळे यांना अभिमान असणे व महाराष्ट्राला तुमच्या पदाचा आधार वाटणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

27 मार्च रोजी मंत्रालयाच्या दारात एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील धुळ्य़ाच्या शीतल गादेकर आणि नवी मुंबईच्या संगीता डवरे यांचा मृत्यू झाला. या दोन निरपराध महिलांनी सरकारच्या दारात आत्महत्या केली. विषप्राशन केले व सरकार स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी तडतडत बसले आहे. संगीता डवरे व शीतल गादेकर यांच्या आत्महत्येची माहिती आपल्या 'काडतूस' गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे काय? शेतकरी ठिकठिकाणी आत्महत्या करीत आहेत, पण भिजलेल्या काडतुसांना त्यांची चिंता दिसत नाही.

तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच

केंद्रीय यंत्रणा नसतील तर तुम्ही कोण? तुमचे कर्तृत्व काय? तुम्ही तुमच्या पायावर तरी उभे राहू शकाल काय? तुमच्या काडतुसाची दारू ही त्या केंद्रीय यंत्रणांची आहे. नाहीतर तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच आहात. 'मातोश्री'वर चाल करून येण्याची भाषा ही भिजलेली काडतुसे करतात ती याच केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर. सीबीआय आणि ईडी या अंगरक्षकांची कवचे काढली तर तुम्हाला रिकाम्या पुंगळ्य़ांचीही किंमत उरणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com