Sanjay Raut News: मला धमकी देणारा 'तो' व्यक्ती शिंदे गटाचा; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Threat Case: मला धमकी देणारा आरोपी मयूर शिंदे हा शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut Threat Case latest updates
Sanjay Raut Threat Case latest updatesSaam TV
Published On

Sanjay Raut Threat Case Updates: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो संजय राऊत यांचाच निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. या प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलं असताना, खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

Sanjay Raut Threat Case latest updates
Maharashtra Politics नरभक्षक हत्ती पिसाळलेल्या वाघापेक्षा भयंकर, शिवसेना-भाजपच्या नाराजीनाट्यावर सामनातून बोचरी टीका

ठाकरे गटाचे खासदार  संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मला धमकी देणारा आरोपी मयूर शिंदे हा शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे, असा आरोप केला आहे. जाहिरात कांडावरून लक्ष विचलित करण्यासाठी मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे, असंही राऊत म्हणाले.  (Maharashtra Political News)

धमकीचा बनाव मूर्ख लोक करतात, जर मीच बनाव केला असता, तर पोलिसांनी (Police) आरोपीबाबत कळवलं नसतं. तसंच त्याचा नंबरही दिला नसता, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर मी कधीही पोलिसांकडे सुरक्षा मागितली नाही, असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

Sanjay Raut Threat Case latest updates
Ajit Pawar News : 'शासन आपल्या दारी' उपक्रमावर प्रचंड खर्च, पण नागरिकांना फायदा होतोय? अजित पवारांकडून प्रश्न उपस्थित

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या एका फोन संभाषणाची ही ऑडिओ क्लिप होती. यामध्ये समोरची व्यक्ती राऊत बंधूंना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं ऐकू येत होतं. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपास करून या प्रकरणातील आरोपी मयूर शिंदे याला अटक केली. मात्र, अटक केलेला आरोपी हा संजय राऊत यांच्याच निकटवर्तीय असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. इतकंच नाही, तर संजय राऊत यांनी पोलिस सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं. यावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com