Dead Body Carried In Auto Rickshaw: मृत्यूनंतरही हाल संपेना! रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह रात्रभर रिक्षातून फिरवला, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Smart City Pune: आजीच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आणि शवघर न मिळाल्यामुळे त्यांना रिक्षातूनच मृतदेह फिरवावा लागला.
Dead Body Carried In Auto Rickshaw
Dead Body Carried In Auto RickshawSaam Tv
Published On: 

सचिन जाधव, पुणे

Pune News: मृत्यूनंतरही मृतदेहाची हेळसांड होत असल्याची घटना स्मार्टसिटी पुण्यामध्ये (Pune City) घडली आहे. एका कुटुंबावर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृतदेह रात्रभर रिक्षातून घेऊन फिरण्याची वेळ आली. पुण्याच्या कॉन्टेंटमेंट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Dead Body Carried In Auto Rickshaw
Kupwara Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्यात पुन्हा चकमक; सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कॉन्टेंटमेंट परिसरात राहणाऱ्या प्रमोद चाबुकस्वार या तरुणाच्या आजीचा गुरुवारी रात्री अचानक मृत्यू झाला. आजीच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आणि शवघर न मिळाल्यामुळे त्यांना रिक्षातूनच मृतदेह फिरवावा लागला. हे कुटुंब तब्बल चार तास मृतदेह रिक्षातून घेऊन फिरत होते. स्मार्ट सिटी पुण्यात मृत्यूनंतरही मृतदेहाची थट्टा केली जात असलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

प्रमोद चाबुकस्वार या तरुणाच्या 95 वर्षीय आजीचा अचानक घरी मृत्यू झाला. नवा मोदीखाना कॅम्प येथून केवळ 500 मीटर अंतरावरील एका रुग्णालयात शवागारात आजीचा मृतदेह ठेवण्यासाठी ते रात्री 10 वाजता निघाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी धोबी घाट येथील वाहन तळ गाठले. मात्र त्या ठिकाणी शववाहिका चालविण्यासाठी चालकच नव्हता. त्यामुळे त्यांनी अखेर मृतदेह रिक्षातून घेऊन जायचे ठरवले.

Dead Body Carried In Auto Rickshaw
Ajit Pawar News : 'शासन आपल्या दारी' उपक्रमावर प्रचंड खर्च, पण नागरिकांना फायदा होतोय? अजित पवारांकडून प्रश्न उपस्थित

रात्रीच्या वेळी त्यांनी आणखी एका नातेवाईकच्या मदतीने आजीचा मृतदेह रिक्षात बसून मांडवर ठेवला. आजीचा मृतदेह घेऊन ते कॉन्टेन्टमेंट हॅास्पिटलच्या शवागारात ठेवण्यासाठी गेले. पण शवागारही बंद पडलेले होते. त्यामुळे रात्रभर ते रिक्षातूनच आजीचा मृतदेह घेऊन शवागार शोधत होते. सर्व गोंधळानंतर बऱ्याच तासांनंतर प्रमोद चाबुकस्वार यांनी आजीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेला. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील कॉन्टेंटमेंट हॉस्पिटलमधील प्रशासनाचा गलथान कारभार याला जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com