लैंगिक अत्याचार केला नाही, महिलेनेच उत्तेजित केले; ऋषिकेश वैद्यच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला?

hrushikesh vaidya latest news : ऋषिकेश वैद्यच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. त्यावेळी त्याच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावले.
pune news update
pune news Saam tv
Published On
Summary

ऋषिकेश वैद्य याला केले पुणे कोर्टात हजर

महिलेवर लैंगिक अत्याचार केला नसल्याचा आरोपीच्या वकिलाचा दावा

आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोपीच्या वकिलांचा आरोप

सचिन जाधव, साम टीव्ही

महादेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याला पुणे लष्कर कोर्टात हजर केलं. ऋषिकेश वैद्य याने लैंगिक अत्याचार केला नसून महिलेने त्याला उत्तेजित केल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केलाय. ऋषिकेश वैद्य याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचाही दावा आरोपीच्या वकिलांनी केला. आता या प्रकरणात ऋषिकेश वैद्य याला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी ऋषिकेश वैद्य याचे वकील पवन कुलकर्णी यांनी म्हटलं की, फिर्यादीने ऋषिकेश वैद्य याला फेसबुकवर मैत्रीची विनंती पाठवली होती. वैद्य याने लैंगिक अत्याचार केला नाही. तर महिलेने त्याला उत्तेजित केले. त्याचे मोबाईल सगळे घेतले आहेत. दोघांच्याही मोबाईलवर मेसेज आहे. लॉज वर गेले असे म्हटले आहे, तर सीसीटीव्ही चेक करावा, असा गुन्हा घडला नाही'.

pune news update
भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना! राजकीय नेत्यांना लावला लाखोंचा चुना; १ किलो मधाची बाटली ९ लाखांना विकायचा

'महिला स्वतःहून गेली आहे. आरोप करणारी महिला ३५ वर्षीय असून लग्न झालंय. आरोपीची पार्श्वभूमी चांगली आहे. धार्मिक प्रवचन करणारे आहेत. महिला एवढ्या गप्प का राहिल्या? गुंगीचे औषध देऊन म्हटलं आहे, तसे काही नाही. खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आहे, असे वकील कुलकर्णी यांनी म्हटलं.

वकील पवन कुलकर्णी यांनी पुढे म्हटलं,'ऋषिकेश वैद्य याची बाजू कोर्टात मांडली. सरकारी वकिलांनी १४ दिवस पोलीस कोठडी मागितली. परंतु आम्ही प्रत्येक गोष्टीचे खंडन करून त्यांनी असे कुठलेही कृत्य केलं नाही, असे आमचे म्हणणे आहे. घटना २०२३ ते २५ दरम्यान घडली असून त्याला गुन्हा दाखल करण्यास उशीर का झाला, याचे सबब कारण सांगितलं नाही'.

pune news update
भोंदूबाबाच्या विकृतीचा पॅटर्न, कवडीमोल चिंचोके, लाखोंना विकले, नकली साप आणि वाघानं गंडवलं

आरोपीचा भाऊ धनंजय वैद्य याने सांगितलं की, आरोप चुकीचे आहेत. ते सगळे बनवण्यात आलं आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू. बाकी आमचे वकील न्यायालयात बाजू मांडतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com