Ratnagiri Accident Update: भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

खमींचा खर्च देखील सरकार करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
Ratnagiri Accident Update
Ratnagiri Accident UpdateSaam TV
Published On

Ratnagiri Accident Update: रविवारी रत्नागिरी - दापोली येथे दोन वाहनांचा भीषण अपघात झाला होता. अपघात इतका भीषण होता की यात अनेक जण जखमी झाले. तसेच ८ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यामुळे अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री साह्ययता निधीतून (Chief Minister's Relief Fund ) उपचारासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

प्रत्येकी ५ लाख रुपये

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबत माहिती दिली आहे. तसेच जखमींचा खर्च देखील सरकार करणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Ratnagiri Accident Update
Dombivli Crime News : जीवाच्या आकांताने तो पळत होता, रस्त्यामध्येच कोसळला; थरारक घटना CCTV मध्ये कैद

काल दुपारी ३.३० च्या सुमारास रत्नागिरी (Ratnagiri) दापोलीतील आसूद जोशी आळी येथे दोन वाहनांमध्ये भीषण अपघातात झाला. ट्रक आणि खासगी प्रवासी वाहनामध्ये हा भयंकर अपघात झाला होता. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.

मरियम गौफिक काझी (६ वर्षे) स्वरा संदेश कदम (८ वर्षे) संदेश कदम, (५५ वर्ष) अनिल सारंग (४५ वर्षं) फराह तौफिक काझी (२७ वर्ष) मिरा महेश बोरकर (२२,वर्ष) वंदना चोगले (३८) आणि समिया इरफान शिरगावकर अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

Ratnagiri Accident Update
Virar Crime: कामावरुन घरी परतलीच नाही... विहिरीत आढळला मृतदेह; ३८ वर्षीय महिलेसोबत काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com