Bribe Case : कोकणात खळबळ! महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा अडकला जाळ्यात

Kokan Chiplun Bribery Case : चिपळूणमध्ये सातबारा उताऱ्यात फेरफार करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याला रत्नागिरी ACBने रंगेहाथ पकडले.
Chiplun Revenue Officer Caught Taking ₹10,000 Bribe Ratnagiri ACB
Chiplun Revenue Officer Caught Taking ₹10,000 Bribe Ratnagiri ACBAI Image
Published On
Summary
  • चिपळूणमध्ये सातबारा उताऱ्यात फेरफार करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप

  • मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याला रत्नागिरी ACBने रंगेहाथ पकडले

  • तक्रारदाराच्या कारमध्ये १० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारल्याची माहिती

  • चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

कोकणातील चिपळूण तालुक्यातील महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने लाच स्वीकारल्याची घटना समोर आली आहे. सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची माहिती आहे. उमेश राजेशिर्के असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने सरकारी कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याचे काम संबंधित महसूल विभागाकडे होते. हे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या मागणीमुळे तक्रारदाराने याबाबत रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली.

Chiplun Revenue Officer Caught Taking ₹10,000 Bribe Ratnagiri ACB
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

तक्रार मिळाल्यानंतर ACB ने तक्रारीची सत्यता जाणून घेण्यासाठी तपास केला. या तपासादरम्यान लाचेची मागणी झाल्याचे समोर आले. यानंतर राजेशिर्के याच्यावर कारवाई करण्यासाठी विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराच्या कारमध्ये मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के आला. यावेळी त्याने तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राजेशिर्केला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Chiplun Revenue Officer Caught Taking ₹10,000 Bribe Ratnagiri ACB
Karlyacha Juice : डायबिटीजला आता बोला बाय बाय! कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने 'हे' ६ आजार पळतील दूर

दरम्यान, या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांकडून लाचेची मागणी होत असल्यास त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या शासकीय कामांसाठी लाच मागणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com