
बीडमधील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. रणजीत कासले यांनी बुधवारी सकाळी व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती दिली. व्यवस्थेच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नसल्याचे म्हणत कासले यांनी शरण येणार असल्याचं म्हटलं. या व्हिडिओनंतर आणखी नवा व्हिडिओ कासले यांनी पोस्ट केला आहे. यावेळी कासले यांनी जीवाला धोका असल्याचे म्हणत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली.
रणजीत कासले यांनी जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी कासले यांनी केली. रणजीत कासले यांनी नव्या व्हिडिओमध्ये म्हटलं की, 'करुणा मुंडेंच्या कारमध्ये धनंजय मुंडे यांनीच रिवाल्वर ठेवलं होतं. रिवाल्वर ठेवण्यासाठी चार-पाच लोक त्यांनीच पाठवले असतील. महाराष्ट्र सरकार पुरावे नष्ट करत आहे. स्टेशन डायरी नोंद डायऱ्या सर्व बदलण्याचे काम चालू आहे'.
'माझ्या घराचा टाळा तोडून माझ्या घरावरती नोटीस लावण्यात आली आहे. टाळा कशामुळे तोडले, असा जबाब रणजीत कासले यांनी व्हिडिओमधून विचारला आहे. मी उद्या पुणे येथे एअरपोर्टवर येणार आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहे. पुणे येथून मला बीड पोलिसांनी अटक करावी आणि मला संरक्षण द्यावे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असे ते पुढे म्हणाले.
'अक्षय शिंदेचे हातपाय बांधून त्याचा एन्काऊंटर होतोय. बीड येथील माझ्या घरी चार-पाच लोक घुसून पुरावे नष्ट करण्याचे काम करत आहेत.
कोण आहेत रणजीत कासले?
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. ते धनंजय मुंडे यांच्याबाबत खळबळजनक दावा केल्याने चर्चेत आले आहेत. 'धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती. कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.