अक्षय गवळी, साम टीव्ही
विधान परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत 9 जागांपैकी दोन जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणारायेत. यासाठी पक्षात इच्छुकांची मोठी रांग पाहायला मिळतीये. अकोल्यातील शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केलीये. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचा सविस्तर आढावा मांडलाय. पवळ यांनी राज्य समन्वयक म्हणून काम करताना विदर्भ आणि मराठवाड्यात हजारो कार्यकर्ते शिवसेनेत जोडल्याचा दावा केलाय.
तसेच, बुलडाणा लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचेही त्यांनी नमूद केलेय. विधानसभेवेळी बाळापूरातून उमेदवारी न मिळाल्याची खंत व्यक्त करतानाच आता पक्षाने न्याय देण्याची मागणी त्यांनी केलीये. ओबीसी आणि वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून संधी दिल्यास सकारात्मक संदेश जाईल, असेही पवळ यांनी पत्रात म्हटलेय. दरम्यान, शिवसेनेत कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि संधी यांचा समतोल साधण्याचे आव्हान नेतृत्वासमोर असल्याचे या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झालेय.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक होतो. हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी तन-मन-धनाने मतदार संघात वातावरण तयार करून पक्षाकडे अभ्यासपूर्ण मागणी केली. आणि ती यशस्वी झाली. जातीय समीकरण देखील पोषक असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने तयारी देखील केली. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, ऐन निवडणुकीत भाजपमधून केवळ निवडणूक लढण्यासाठीच शिवसेनेत आलेल्या बळीराम सिरस्कार यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यावेळी नाराज झालो. मात्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी सबुरीचा सल्ला देऊन आगामी काळात विधानपरिषदेवर किंवा राज्य स्तरीय महामंडळावर संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल, असे आश्वस्थ केले. आपले आयात उमेदवार यांच्याविषयी असलेल्या नाराजीमुळे बाळापूरमध्ये पक्षाला अपयशाचा सामना करावा लागला त्यामुळे सिरस्कार तीन नंबरवर फेकले गेले.
शिवसेनेचा विश्वासघात करून संबंधित उमेदवार बळीराम सिरस्कार दोनच महिन्यात भाजपमध्ये परतले देखील. बुलडाणा लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विशेष जबाबदारी प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने माझ्यावर काही जबाबदारी दिली असती तर अमरावती विभागात चित्र वेगळे दिसले असते, याची आपण आपल्या सूत्रांना मार्फत माहिती घ्यावी. त्यांनी पुढं म्हटलेये पक्षात माझा योग्य मानसन्मान राखून आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी बाळापूरमध्ये थांबण्याचा सल्ला देऊन विधानपरिषद किंवा राज्यस्तरीय महामंडळावर नियुक्तीच्या आश्वासनाची पूर्ती देखील आपल्याकडून केली जाईल, याची खात्री आहेच. वंजारी समाजातून येणाऱ्या ओबीसी घटकाला आपल्याकडून न्याय मिळाल्यास महाराष्ट्रात देखील निश्चितच एक सकारात्मक संदेश जाईल. आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याकडून मिळणाऱ्या न्यायाच्या कायम प्रतीक्षेत राहील, असेही त्यांनी पत्रातून खंत आणि म्हणण मांडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.