अभिजीत दीपकेंना थेट केंद्रीय मंत्र्यांची पक्षात येण्याची ऑफर; म्हणाले अटी-शर्ती...

Ramdas Athawale Offers Abhijit Dipke To Join RPI: हायकोर्ट टायपिंग परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात आंदोलन करणारे अभिजीत दीपके यांच्या भूमिकेचे रामदास आठवले यांनी कौतुक केले. दीपके यांना आरपीआयमध्ये प्रवेशाची खुली ऑफर देत पक्षप्रवेशासाठी अटी-शर्ती असतील, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
Ramdas Athawale offers Abhijit Dipke to join RPI
Ramdas Athawale offers Abhijit Dipke to join RPIsaam tv
Published On

अमोल कलये, साम टीव्ही

हायकोर्ट टायपिंग परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे अभिजित दीपके यांच्या भूमिकेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केले आहे. चिपळूण दौऱ्यावर असताना आठवले यांनी दीपके यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)मध्ये प्रवेशाची खुली ऑफर दिली. मात्र, पक्षप्रवेशासाठी काही अटी आणि शर्ती असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ramdas Athawale offers Abhijit Dipke to join RPI
आंदोलक तरुणांवर लाठीमार, मोदी-शहांचं नाव घेत अभिजीत दीपकेचं पुन्हा आंदोलन; म्हणाला, सोनम वांगचुक यांच्या जीवाला धोका

अभिजित दीपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले. मात्र, जंतर-मंतरवरील आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने व्हायला हवे होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दीपके यांनी RPIमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच करू, असे आठवले यांनी सांगितले. पक्षात प्रवेश दिल्यानंतरही त्यांना आंदोलन करण्याची परवानगी असेल का, याबाबत विचारले असता, पक्षाच्या भूमिकेनुसार आणि ठरावीक अटी-शर्तींनुसार त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

Ramdas Athawale offers Abhijit Dipke to join RPI
Abhijeet Dipke: तू भाजपात ये नाही तर तुला गोळ्या घालू, अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप

दरम्यान, दलित समाजातील तरुणांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधींचा उपयोग करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

Ramdas Athawale offers Abhijit Dipke to join RPI
Abhijit Dipke: धर्मेंद्र प्रधानांचा राजीमाना घ्या नाहीतर पुढचा नंबर तुमचा! अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना थेट इशारा

कोकणच्या विकासासाठी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याची गरज असल्याचेही आठवले यांनी नमूद केले. कोकणातील पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असे ते म्हणाले. NEET पेपरफुटीच्या विरोधात अभिजीत दीपके यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात देशभरातून तरुण सहभागी झाले होते. अखेर मोदी सरकारला कॉकरोच जनता पार्टीसमोर झुकावे लागले आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी देखील अभिजीत दीपके यांची भेट घेतली होती. यावर भाजपने नाराजी व्यक्त केली होती. अशातच आज केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी थेट पक्षात येण्याची ऑफर दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com