

अभिजीत दीपके यांनी भाजपवर गंभीर आरोप केला
भाजपमध्ये या नाहीतर गोळ्या घालू अशी धमकी दिल्याचे ते म्हणाले
अभिजीत दीपके यांना पक्ष प्रवेशासाठी धमकी
पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील केला घणाघात
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. 'मोदींना संविधानापेक्षा मोठं केल्याने देशाची वाट लागली', असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. त्यांनी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि संविधानाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तू भाजपात ये नाही तर तुला गोळ्या घालू, अशा धमक्या मला आल्या होत्या असा दावा अभिजीत दीपके यांनी केला आहे.
अभिजीत दीपके यांनी भाजपकडून ऑफर आल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'या देशातील जनतेला एकत्र येणं गरजेचं आहे. मला भाजपकडून खूप ऑफर आल्या. कितीही ऑफर आल्या तरी मी भाजपमध्ये जाणार नाही. मला भाजपमध्ये जायचं असतं तर मी आधीच गेलो असतो. धमक्या आल्या होत्या की भाजपमध्ये सहभागी व्हा, आंदोलन मागे घ्या नाही तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालू. ही भाजपची आणि संघाची प्रेमाची भाषा आहे. तू ये नाही तर तुझं काही तरी करून टाकू. आई-बाबांना देखील धमक्या दिल्या जात आहे. तुझ्या घरी जाऊन आई-बाबांना पाहून घेऊ अशा अनेक धमक्या आल्या आहेत.'
अभिजीत दीपके यांनी पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले की, 'तुम्ही माझं काय करणार आहात. तुम्ही एका ३० वर्षांच्या मुलाला भीती दाखवता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नातवाच्या वयाचा मी आहे. तुम्ही तुमच्या नातवाच्या वयाच्या मुलांना अशा धमक्या देतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला की काय करताय तुम्ही?'
झेनझीचा चेहरा पुढील काळात राजकारणात जाईल का? यावर अभिजीत दीपके यांनी सांगितले की, 'खूप पुढचे बोलत आहोत आपण. एका माणसाला मोठं करू नका. आपल्या देशाची जी काही वाट लागली आहे ती यामुळे लागली आहे. २०१४ मध्ये जो माणूस आला त्याला आपण आपल्या संविधानापेक्षा आणि देशापेक्षा मोठं केलं. आपण त्याला देवापेक्षा मोठं करून टाकलं. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं होत नाही. आपल्या शिक्षण व्यवस्था, सरकारी रुग्णालयांच्या अवस्थेबद्दल बोलणं होत नाही. कारण आपण सगळ्यांनी एका माणसाला आपल्या देशापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठं करून टाकलं. सकाळ ते संध्याकाळपर्यंत सर्व मीडियावाले मोदीचा जप करत आहेत. त्यांनी बेरोजगारीवर बोललं पाहिजे. '
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.