अभिजीत दीपके नेमकं आहेत कुठे? आंदोलन संपले तरीही घरी परतले नाहीत, सुरक्षा पुरवा; राज्यातील मंत्र्याची मागणी

Abhijeet Deepke latest news : नीट पेपरफुटीविरोधातील ३६ दिवसांच्या दिल्ली आंदोलनानंतर अभिजीत दीपके अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यांना टायफाइड झाल्याची माहिती समोर आली असून, राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
Abhijeet Deepke latest news
Abhijeet Deepke latest newsSaam TV
Published On

नीट (NEET) परीक्षा घोटाळा व पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत ३६ दिवस चाललेल्या आंदोलनानंतर 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके हे अद्याप घरी न परतल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, दीपके यांना 'टाइफाइड' झाल्यामुळे ते अद्याप आले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आपल्या भागातील तरुणाने इतका मोठा लढा उभारल्याचा अभिमान व्यक्त करत, त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या अभिजीत दीपके यांच्या कुटुंबाची मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सीजेपीचे आंदोलन मागे घेतल्यानंतरही अभिजीत अद्याप घरी का पोहोचले नाहीत, यावर स्पष्टीकरण देताना शिरसाट यांनी सांगितले की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजीत यांना टाइफाइडची लागण झाली आहे. उपचारांमुळे ते अजून घरी आलेले नाहीत.

Abhijeet Deepke latest news
Pune : दुचाकी स्लीप झाली अन् धावत्या ट्रकखाली गेली, दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले ?

"अभिजीतला भेटायला आधीच यायचं होतं; मात्र त्याचे राजकीय पडसाद उमटले असते, म्हणून भेट टाळली. अभिजीतला आता मोठे यश मिळाले आहे आणि तो माझ्या मतदारसंघातील आहे. माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश संपादन करतो, त्या वेळी त्याला भेटणे हे माझे कर्तव्यच आहे. सरकारने अभिजीतच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यातूनच त्याला यश मिळाले. अभिजीतच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी व पक्षांनी स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्याचे काम केले. अभिजीत येत्या दोन-तीन दिवसांत घरी येईल, असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले. निश्चितच, अभिजीत जेव्हा महाराष्ट्रात येईल, तेव्हा त्याच्या जिवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे त्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी करणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

Abhijeet Deepke latest news
Paper Leak : नीटनंतर राज्यात MPSC चा पेपर फुटला? १०० पैकी ९० प्रश्न फुटल्याचा आरोप, शिक्षण क्षेत्रात खळबळ

भगवान दीपके काय म्हणाले?

अनेक नेत्यांनी मला फोन केले आणि माझी भेटही घेतली; मात्र ज्यांच्यासोबत मी १५ वर्षे काम केले, तेच पालकमंत्री मला भेटत का नाहीत किंवा फोन का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु, त्यांनी त्याचे उत्तर दिले आहे. 'मी आल्यानंतर यावरून कोणतेही राजकारण होऊ नये, म्हणून मी आलो नाही,' ही त्यांची भूमिका योग्य आहे. आज ते आले, याचा आनंद आहे. अभिजीत घरी आल्यानंतरच पुढची भूमिका आणि दिशा काय असेल, हे सांगता येईल. सध्या यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही, असे भगवान दीपके म्हणाले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com