Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेची प्रकृती खालावली, म्हणाले - मला माफ करा...

CJP founder Abhijeet Dipke falls ill during Delhi Protest: अभिजीत दीपके यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांनी जंतर-मंतर सोडले आहे. पण लवकरच परत येईन असं त्यांनी सांगितले.
Abhijeet Dipke
Abhijeet Dipke Saam TV
Published On
  • अभिजीत दीपके यांची प्रकृती खालावली

  • अभिजीत दीपकेंनी जंतर-मंतरवरील आंदोलनातून काही काळासाठी विश्रांती घेतली

  • ताप, अंगदुखी आणि शारीरिक वेदनांमुळे त्यांनी जंतर-मंतर सोडले

  • यावेळी त्यांनी आंदोलकांची माफी मागितली

दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली आहे. प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे अभिजीत दीपकेंना जंतर-मंतर सोडावे लागले. यावेळी त्यांनी सर्व आंदोलकांची माफी मागितली. मला माफ करा असे म्हणत त्यांनी आंदोलनस्थळ सोडले. अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावल्यामुळे उपस्थित आंदोलक चिंतेत आले आहेत.

गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर आंदोलन कर अलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे आजारी पडले. गुरूवारी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आंदोलनस्थळ सोडावे लागले. अभिजीत दीपके यांनी आंदोलकांची माफी मागितली आणि काही तास विश्रांती घेणार असल्याचे सांगितले. आपल्याला ताप आणि प्रचंड वेदना तसंच अंगदुखी होत असल्याचे दीपके यांनी सांगितले. यापूर्वी मंगळवारी दीपकेयांना उलट्या झाल्या होत्या. मंचावर असताना त्यांना चक्कर देखील आली होती.

अभिजीत दीपके २० जूनपासून दिल्लीतील जंतर- मंतरवर आंदोलन करत आहेत. अमेरिकेतून दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यानंतर लगेच सुरू झालेल्या धावपळीमुळे त्यांना विश्रांतीची संधीच मिळाली नाही. जंतर -मंतरवरील दिवस-रात्र होणारी प्रचंड गर्दी आणि गोंगाट, आंदोलन सांभाळणे, नेत्यांना भेटणे, भविष्यातील रणनीती आखणे, पोलिस, प्रशासन आणि सरकारचा सामना करणे या सगळ्यात अभिजीत दीपके यांच्या शरीरावर परिणाम झाला आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांत त्यांना अनेकदा शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. पण आतापर्यंत त्यांनी औषधोपचारांच्या मदतीने परिस्थिती सांभाळली. गुरुवारी त्रास वाढला आणि त्यांना असह्य वाटले तेव्हा त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या समर्थकांना माहिती दिली आणि विश्रांतीची परवानगी मागितली.

Abhijeet Dipke
CJP Protest : दिल्लीतील वातावरण तापले! TV स्क्रीनवर मोदी दिसताच आंदोलकांकडून चोर चोर घोषणा | VIDEO

अभिजीत दीपक यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, 'मला ताप आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या अंगात तीव्र वेदना होत आहेत. मी वेदनाशामक गोळ्या घेत आहे आणि कसेबसे तग धरून आहे. जर मी आज जंतर मंतरवर तुम्हाला दिसलो नाही तर कृपया मला माफ करा. मला काही तास विश्रांती आणि बरे होण्याची गरज आहे. मी संध्याकाळपर्यंत आंदोलनस्थळी परत येईन.' बरं झाल्यानंतर आंदोलनस्थळावर येऊन पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे आश्वासन अभिजीत दीपके यांनी दिले.

Abhijeet Dipke
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com