CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Amit Thackeray And Aditya Thackeray At Shivaji Park: दादरमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पाठिंबा दिला. त्यांनी आंदोलन ठिकाणी भेट दिली.

मुंबईमध्ये दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देली. त्याचसोबत ठाकरेसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे या दोघांनी देखील शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांना संबोधित केले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. भरपावसात देखील विद्यार्थी याठिकाणी आले आहेत. हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी फरफटत नेत आंदोलक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मारहाण केली. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ अनेक विरोध पक्ष एकत्र येत त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि अभिजीत दीपके यांची भेट घेतली. या सर्वांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पीएम मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com