

जंतर-मंतरवर NEET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा ३६ वा दिवस आहे. आंदोलनादरम्यान CJP चं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी गेलं होतं. या चर्चेनंतर सरकारने पक्षाच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य केल्या आहेत.
परंतु केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य झाली नसून पक्षाने ही मागणी कायम ठेवलीये. या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत सरकारवर जोरदार टीका केली.
अभिजित दिपके म्हणाले की, जंतर-मंतरवरील आंदोलन आता केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहिलेले नाही. आंदोलनाचा विस्तार देशभर होत असून काल मुंबईत यापेक्षाही मोठं आंदोलन करण्यात आलं. तसंच बंगळुरूमधील नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. पुण्यात झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करताना, "पुण्याच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आंदोलन असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं," असेही अभिजीत दिपके म्हणाले.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम उलटेच होतील, असा इशाराही दिपके यांनी दिला. "जेवढे तुम्ही लोकांना तुरुंगात टाकाल, तेवढे अधिक लोक आंदोलनात सहभागी होतील," असा इशारा त्यांनी बिहार सरकारलाही दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिपकेंनी थेट इशारा दिला. "मोदींना इतकंच सांगायचं आहे की, वेळ गेलेली नाहीये. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा लवकर राजीनामा घ्या, नाहीतर तुमचा नंबर येईल," असा इशारा अभिजित दिपके यांनी दिला.
याशिवाय, दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. "गेल्या काही दिवसांपासून दिल्ली पोलीस पुन्हा चुकीची कामं करतायत. दिल्ली पोलिसांनी वर्दी काढून RSS चे कपडे घालावेत. दिल्ली पोलिसांचे अधिकारी पाहिले तरी राग येतो. त्यांनी थोडी लाज बाळगावी आणि जनतेशी प्रामाणिकपणे काम करावं," असं अभिजित दिपके म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.