Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधानांचे मंत्रिपद बदलू नका, थेट बडतर्फ करा; राहुल गांधींचा सरकारला अल्टिमेटम

Rahul Gandhi On Dharmendra Pradhan: राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचे खातेबदल करू नका त्यांचा राजीनामा पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधानांचे मंत्रिपद बदलू नका, थेट बडतर्फ करा; राहुल गांधींचा सरकारला अल्टिमेटम
Rahul Gandhisaam tv
Published On
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलन सुरू

  • आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले

  • राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिमंडळातून थेट बडतर्फ करण्याची मागणी केली

  • विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या दुर्लक्षित करता येणार नाहीत असे ते म्हणाले

दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीजेपीचे शिष्टमंडळ आणि सरकार यांची शनिवारी दुपारी ३:३० वाजता बैठक होणार आहे. सरकारने सीजेपीकडे आज दुपारपर्यंतचा वेळ मागितला होता.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १० जनपथ येथून विद्यार्थी आंदोलनासंदर्भात एक मोठे विधान केले. राहुल गांधी यांनी सरकारले थेट अल्टिमेटम दिला. त्यांनी सांगितले की की, 'विद्यार्थ्यांच्या ३ मागण्या आहेत ज्या कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित केल्या जाऊ शकत नाहीत. धर्मेंद्र प्रधानांचे मंत्रिपद बदलू नका त्यांना बडतर्फ करा.'

आंदोलक विद्यार्थ्यांची पहिली मागणी हे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आहे. दुसरी मागणी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांना शिक्षा व्हावी. तर तिसरी मागणी ही आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी ही आहे. राहुल गांधी यांनी सांगितले की, या मागण्या त्यांनी स्वत:नाही बनवल्या. तर देशभरातील विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.

Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधानांचे मंत्रिपद बदलू नका, थेट बडतर्फ करा; राहुल गांधींचा सरकारला अल्टिमेटम
CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, अशी माहिती मिळत आहे की सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण खाते काढून घेऊन दुसरे खातं देण्याचा विचार करत आहे. असं जर झाले तर ते कुणालाच मान्य नसेल. धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचार आणि अपयशाचा चेहरा बनले आहेत. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला हानी पोहचत आहे. त्यामुळे त्यांचे खातं बदलण्याऐवजी त्यांना पदावरून कायमचं काढून टाकले पाहिजे.'

Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधानांचे मंत्रिपद बदलू नका, थेट बडतर्फ करा; राहुल गांधींचा सरकारला अल्टिमेटम
CJP Protest: मोठी बातमी! अभिजीत दीपकेची प्रकृती खालावली, टायफॉईड होऊनही आंदोलनावर ठाम; VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com