संजय महाजन, साम टीव्ही
जळगाव: सुवर्ण बाजारात सातत्याने चढउतार होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मागच्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत आहे. रक्षाबंधन सणाच्या आदल्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होत असलेल्या बदलामुळे सुवर्ण बाजारात सातत्याने चढउतार होत असल्याचे चित्र आहे. मागील महिन्यात सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. यानंतर थोडा दिलासा मिळाला होता. तर या महिन्याच्या सुरवातीला देखील सोने-चांदीचे दर चढते राहिले होते. मध्यंतरी दर स्थीरावले असताना मागील आठवड्यात मोठी घसरण झाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरवातीलाच दर काहीसे वाढले असताना मागील दोन दिवसांपासून दरात घसरण झाली आहे.
3 हजाराने दर झाले कमी
सुवर्ण बाजारात बुधवारी (ता.२६) सोन्याचा भाव 1 लाख ६१ हजार ३०० (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. यात आज (ता.२७) तीन हजार रूपयांची घसरण झाली असून सोन्याचा भाव 1 लाख ५८ हजार ३०० रूपयांवर आला आहे. तर बुधवारी चांदी 2 लाख ४८ हजार (प्रतिकिलो, विनाजीएसटी) होती. आज 3 हजार रूपयांची घसरण झाली असून चांदी 2 लाख ४५ हजार रुपयांवर (प्रतिकिलो, विनाजीएसटी) आली आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा
मागील दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत आहे. यामध्ये चांदीचे दर अधिक खाली आले असून रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर कमी झालेले दर दिलासा देणारे आहेत. प्रामुख्याने भावांसाठी चांदीच्या राखी घेणाऱ्या बहिणींना चांदीचे कमी दर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.