मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

सुशांत सावंत

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha Election) राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने आता प्रत्यक्ष मतदानातूनच कौल स्पष्ट होणार आहे. अशातच राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पहिला फटका बसण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडी राज्यसभेत भाजपला (BJP) मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

Uddhav Thackeray
...म्हणून अजित पवारांनी सोनिया गांधी, राज ठाकरेंना कोरोना झाल्याचं उदाहरण दिलं

बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील हे राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटूंबावर सध्या ईडीची देखील टांगती तलवार असल्याने ते भाजपला मतदान करणार असल्याचा माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने शिवसेनेने आपले लक्ष वसई-विरार आणि पालघरकडे वळवले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे तर गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यातमध्ये चांगलेच सक्रिय झाल्याने बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढत चालली आहे.

वसई-विरार महानगर पालिका निवडणूकीसाठी देखील शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. याचमुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे

Uddhav Thackeray
Jalna Crime: पत्नीने पतीच्या अनैतिक संबंधांची क्लिप माहेरी पाठवली; त्यानंतर घडलं भयंकर

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता 15 तर भाजपला 20 मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष व अपक्ष अशा 29 मतांवर शिवसेना व भाजपची भिस्त असेल. यातूनच ‘घोडेबाजार’ म्हणजेच आमदारांना वश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यातूनच भाजप की शिवसेनेचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होतो वा काँग्रेसला फटका बसतो याची उत्सुकता असेल.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना 55, राष्ट्रवादी 53 आणि काँग्रेस 44 अशी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांची 152 मते आहेत. भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 29 आमदार आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com