पुणे : आपल्या आक्रमक आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवा एका कार्यक्रमात सत्कार स्विकारायला आलेल्या जाड पोलिसाला 'जरा कमी व्हा' असा सल्ला दिला होता. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
अशातच आज अजित पवार (Ajit Pawar) मुंढवा येथे बांधण्यात आलेल्या कै.चंचलाताई कोद्रे जिमनाशियम हॉलचे लोकार्पण कार्यक्रमासाठी आले असता, या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना मास्क घालण्याचं आवाहन करताना राज ठाकरे, सोनिया गांधी यांना आता कोरोना झाल्याचं उदाहरण दिलं.
यावेळी बोलताना अजित पवारांनी माजी महापौर कै.चंचला कोद्रे यांच्या कामाच्या आठवणी सांगितल्या. ते पुढे म्हणाले, 'मूंढवा वाढलं तसे प्रश्न वाढले, काही ठिकाणी अतिक्रमण झालं, रस्ते वाढलं. जे शक्य असेल ते करण्यासाठी प्रयत्न करेल, पण अशक्य असणाऱ्या गोष्टी चेक करून अशक्य आहे असं सांगेन. तसंच पुणेकर मुंढवाकर रस्त्यावर कचरा (Garbage) कशाला टाकता, स्वतःच घर साफ अन् कचरा बाहेर यावर कठोर भूमिका घ्यायला लावू नका, कचऱ्यामुळे रोगराई होते असा इशारा देखील पवारांनी दिला.
तसंच आता कोरोना (Corona) पुन्हा वाढतोय, इथे पण काही बसलेल्या भगिनींनी मास्क घातला आहे. स्टेजवर फक्त एकाने मास्क घातला आहे, बाकी कोणीच घातला नाही. सगळे सांगतात मास्क घाला, मुख्यमंत्री म्हणतात, मी म्हणतोय, परत कोरोना येतोय, अजून कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही, टेस्टिंग कमी आहे. लस घ्या, बुस्टर डोस घ्या असं सांगंत असताना अजित पवारांनी राज ठाकरे आणि सोनिया गांधी यांना (Raj Thackeray And Sonia Gandhi) कोरोना झाला आहे, राज ठाकरे यांच ऑपरेशन होत त्यावेळी कळाल त्यांनापण कोरोना झालाय. त्यामुळे कोरोना अजून गेला नाही काळजी घ्यायला हवी असं त्यांनी उपस्थितांना सांगितलं.
दरम्यान, महापालिका मुदत संपली आहेत ,निवडणूका पुढे गेल्या आहेत. आता ओबीसी प्रश्न आहे पण ओबीसी घटकांना हक्क मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ५० टक्क्यांच्या पुढं न जाता कोर्टच्या आदेशाचं पालन करून मध्यप्रदेशच्या धर्तीवर आरक्षण देण्याचा प्रयत्न करू असंही पवार यांनी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.