Jalna Crime: पत्नीने पतीच्या अनैतिक संबंधांची क्लिप माहेरी पाठवली; त्यानंतर घडलं भयंकर

दोन महिन्यांपूर्वीच नुसरतचा विवाह झाला होता.
Jalna Bhokardan Crime
Jalna Bhokardan CrimeSaam TV
Published On

जालना: पत्नीने पतीच्या अनैतिक संबंधांची ऑडीओ क्लीप (Audio Clip) माहेरच्या लोकांना पाठवली. याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या तोंडात लिंबू कोंबून तिची निर्घृणपणे हत्या केली. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना जालना (Jalna) जिल्ह्यातल्या भोकरदन (Bhkardan) तालुक्यातील हसनाबाद (Hasnabad) येथे घडली. नुसरत इम्रान कुरेशी (वय 22) असं मयत विवाहित महिलेचं नाव आहे. (Jalna Bhokardan Crime News)

Jalna Bhokardan Crime
अरे बापरे! चक्क पोलीस उपनिरीक्षकाला लाथा बुक्यांनी मारहाण; दोन जणांना अटक

याप्रकरणी हसनाबाद पोलिसांनी मृत महिलेचा पती इम्रान महेमुद, सासू, सासरा, नणंद, नणंदजावई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हसनाबादमधील कुरेशी मोहल्ला भागात राहत्या घरात 31 मे रोजी नुसरत महेमूद या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. नुसरतने आपल्या पतीचे अनैतिक संबध असल्याची तक्रार माहेरच्या लोकांकडे केली होती. इतकंच नाही तर, तिने पतीच्या अनैतिक संबंधांची ऑडीओ क्लीप माहेरच्या लोकांना पाठवली होती.

याचा राग मनात धरून नुसरत वेड्यासारखी करते, असं म्हणत सासरच्या मंडळींनी तिला दर्ग्यात नेऊन तिच्या तोंडात लिंबू कोंबून तिला मारहाण केली. तसेच तिची हत्याही केल्याचा आरोप नुसरतच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकंच नाही तर, नुसरतचा पती व्यवसायासाठी एक लाखांची मागणी करत होता, असा आरोपही नुसरतच्या नातेवाईकांनी केला.

Jalna Bhokardan Crime
ना-हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजारांची लाच; सरपंच, पोलीस पाटील, अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

विशेष बाब म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच नुसरतचा विवाह झाला होता. विवाहानंतर एक महिना तिला चांगली वागणूक दिली. नंतर मात्र तिचा हुंड्यासाठी छळ सुरु झाला. अशी तक्रार हसनाबाद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. घरात नुसरतचा मृतदेह आढळून आल्यानंतर नंतर शवविच्छेदनसाठी हसनाबादमधीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.

अखेर नुसरतच्या माहेरच्या नातेवाईकांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मयत महिलेचा पती इम्रान महेमुद,सासू,सासरा,नणंद, नणंदवई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हसनाबाद पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com