अरे बापरे! चक्क पोलीस उपनिरीक्षकाला लाथा बुक्यांनी मारहाण; दोन जणांना अटक

आरोपी नटवर जाधव याने गीते यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत मारहाण केली
Ambarnath Crime
Ambarnath CrimeSaam Tv

अंबरनाथ: रस्त्यात लावलेली गाडी बाजूला करायला सांगितली, म्हणून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत मारहाण करणार्‍यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुरेश उर्फ नटवर जाधव आणि श्रीकांत जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Ambarnath Latest Crime News)

Ambarnath Crime
ना-हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजारांची लाच; सरपंच, पोलीस पाटील, अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात जगदीश गीते हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी अंबरनाथच्या कोहोजगाव दर्गा परिसरात त्यांची बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती. तेथील बंदोबस्त संपवून ते पुन्हा पोलीस ठाण्याकडे परतत होते. वाटेत वांद्रापाडा परिसरात सुरेश उर्फ नटवर जाधव या इसमाने भररस्त्यात दुचाकी आडवी लावल्याचं गीते यांना दिसलं.

यावेळी गीते यांनी जाधव याला दुचाकी बाजूला करण्यास सांगितलं असता, नटवर जाधव याने गीते यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत मारहाण केली. इतकंच नाही तर, श्रीकांत जाधव नावाचा नटवर याचा आणखी एक साथीदार सुद्धा पोलीस उपनिरीक्षक गीते यांच्या अंगावर धावून गेला. याचवेळी बंदोबस्त संपवून मागून आणखी काही पोलीस कर्मचारी येत होते. त्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी तिथे धाव घेतली.

Ambarnath Crime
कर्तव्य बजावून घरी परतताना महिला पोलिसावर काळाचा घाला; अपघातात जागीच मृत्यू

पोलीस येत असल्याचे बघताच नटवर आणि श्रीकांत जाधव या दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. मात्र काही वेळातच पोलिसांनी नटवर याला शोधून बेड्या ठोकल्या. या दोघांवरही अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी नटवर याच्यावर यापूर्वीचे तब्बल १० गुन्हे दाखल असून ४ वेळा चॅप्टर केस, तर एकदा तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com