भीमाशंकर जंगलतोडीवर राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांना १० रोखठोक प्रश्न, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray on Bhimashankar forest cutting : कर्जत-भीमाशंकर परिसरातील जंगलतोड आणि पंप स्टोरेज प्रकल्पांवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० सवाल विचारले आहेत.
Raj Thackeray
Raj Thackeray
Published On: 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत परिसरातील वृक्षतोड आणि पंप स्टोरेज प्रकल्पावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट १० कडक सवाल विचारले आहेत.मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या लेखाचा आणि प्रकल्पांच्या दाव्यांचा समाचार घेत त्यांनी सरकारला घेरले. कर्जतमध्ये जंगालतोडीची पाहणी केल्यानंतर राज ठाकरेंनी संतप्त सवाल केला. मराठी माणूस का आज शांत बसला? राज ठाकरे म्हणाले की, तिथे झाडं कापून रचून ठेवण्यात आली आहेत. हे पाहून मला असे वाटले की मी एखाद्या जंगलाच्या अंत्यसंस्कारालाच आलो आहे. कोणत्यातरी गुजरात्यासाठी ही झाडं तोडून टाकण्याची काय गरज आहे? तसेच, राज्यात सत्तेत असलेल्या लोकांची केंद्रासमोर काहीच किंमत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या लेखाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत १३,५०० मेगावॅटचे करार झाल्याचे आणि ७१,००० कोटींची गुंतवणूक व रोजगार मिळण्याचे सांगितले जाते. पण या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश सुरू असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी मांडला. परंतु या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश सुरू असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी मांडला.

Raj Thackeray
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, काँग्रेसने किती जागा जिंकल्या? पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना अप्रत्यक्षपणे डिवचले

राज ठाकरेंनी विचारलेले १० महत्त्वाचे प्रश्न

पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत १३,५०० मेगावॅटचे करार झाला.यातून ७१,००० कोटींच्या गुंतवणूक आणि ३० हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे म्हटले जाते, तर याशिवाय सह्याद्रीत होणाऱ्या इतर सर्व प्रकल्पांचा तपशील मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवला पाहिजे.

३० हजार लोकांना रोजगार कसा मिळणार? आहे, असे ते म्हणाले होते. हा रोजगार नक्की कसा आणि कुठून दिला जाणार आहे, याची माहिती जनतेला मिळावी.

या संपूर्ण प्रकरणावर एक श्वेतपत्रिका काढणे अत्यंत आवश्यक आहे.

Raj Thackeray
Ladki Bahin Yojana : १५०० रुपयात महिलांना विकत घेतलं जातंय, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

एनएचपीसीसोबत (NHPC) २०२३ मध्ये झालेल्या कराराचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) मराठीत महाराष्ट्रासमोर ठेवावा.

महाराष्ट्राची सध्याची गरज ३० हजार मेगावॅटची असून ती आपल्याकडे आहे, मग आणखी १३ हजार मेगावॅट विजेची गरज कशासाठी?

वाढत्या गरजेसाठी जंगलतोड करणे हाच एकमेव पर्याय आहे का? इतर पर्यायांचा विचार का केला नाही?

एमएमआर (MMR) हा सर्व भाग ताब्यात घेऊन मुंबईला वेगळे करण्याचा आणि तिथे सोसायट्या-इमारती उभारण्याचा हा लॉंग टर्म प्लॅन आहे का?

जगात डेटा सेंटरना विरोध असताना महाराष्ट्रात ती का आणली जात आहेत आणि यातून रोजगार मिळत नसतानाही आग्रह का?

पंप स्टोरेजसाठी पाणी वर उचलण्यासाठी पारंपरिक वीजच खर्च होणार ना? मग ही अपारंपरिक ऊर्जा कशी?

कर्जत-भीमाशंकरची झाडे तोडण्यापूर्वी स्थानिक आदिवासी भागातील ग्रामसभेत याची चर्चा झाली होती का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com