

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमधील २८ विधान परिषद (MLC) जागांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे (मतपत्रिका) पार पडल्या होत्या. यावरून आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.
४ राज्यात २८ जांगावर शिक्षक पदवीधर मतदारसंघात निवडणूक पार पडली. भाजपला काही ठिकाणी विजय मिळला तर काही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. पण काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभवाचा जोरदार धक्का बसला. त्यावरूनच मोदींनी निशाना साधला.
काँग्रेस पक्षाकडून नेहमीच ईव्हीएमच्या (EVM) पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जातात आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली जाते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी एक्स (X) वर पोस्ट करत एक उपरोधिक सवाल विचारला आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमधील २८ विधान परिषद जागांसाठी निवडणुका पार पडल्या. विशेष म्हणजे या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. जरा अंदाज लावा पाहू, यात काँग्रेसने किती जागा जिंकल्या?"
राजकारण तापण्याची शक्यता
काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमविरोधात मोहीम राबवली जात असताना, बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकांच्या निकालांवरून पंतप्रधान मोदींनी साधलेला हा टोला अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या निकालानंतर आता भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा जोरदार राजकीय वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.