Bihar MLC election result : बिहार विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये धक्कादायक राजकीय उलटफेर समोर आला आहे. पाटणा शिक्षक मतदारसंघातूनराष्ट्रीय जनता दल (RJD) चे उमेदवार डॉ. संजीव कुमार यांनी भाजपचे (BJP) दिग्गज नेते नवल किशोर यादव यांचा पराभव केला. संजीव कुमार यांच्या या विजयामुळे भाजपच्या तब्बल ३० वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. या मतदारसंघाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार नवल किशोर यादव यांनी किंचित आघाडी घेतली होती. यादव यांनी सुरूवातीच्या फेरीत १५० मतांनी आघाडी घेतली होती. पण पसंतीच्या मतांच्या मतमोजणीदरम्यान लढतीचे चित्र पालटले. त्यानंतर डॉ. संजीव कुमार सिंह यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला. राजदचे उमेदवार डॉ. संजीव कुमार सिंह यांनी त्यांचा १,०५७ मतांनी पराभव केला.
पाटणा शिक्षक आमदार बदलला
नवल किशोर यादव हे मागील ३० वर्षांपासून पाटणा शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य होते. पण यावेळी आरजेडीच्या उमेदवाराच्या विजयामुळे मतदारसंघातील राजकीय गणित बदलले आहे. ३० वर्षांची भाजपचं या मतदारसंघात वर्चस्व होतं. पण आता त्यांच्या सत्तेला सुरूंग लावला. त्यामुळे आरजेडीसाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. या निवडणुकीत, सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यानंतर, पसंतीच्या मतांमुळे निकालावर परिणाम झाला. अखेरीस, डॉ. संजीव कुमार सिंह विजयी झाले आणि नवल किशोर यादव यांचा ३० वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला
जन सूरज आणि काँग्रेसचे उमेदवारही रिंगणात
या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाच्या दिव्या ज्योती आणि काँग्रेसचे डॉ. संजय यादव हे देखील उमेदवार होते. निवडणूक जिंकल्यानंतर डॉ. संजीव कुमार सिंह यांनी आपला निकाल शिक्षक समुदायाला समर्पित केला. त्यांनी शिक्षकांचे पाठिंब्याबद्दल आभारही मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.