शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Raj Thackeray Exposes Cash Offers In Maharashtra Elections: एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल. कोट्यवधींच्या ऑफर नाकारणाऱ्या उमेदवारांना स्टेजवर आणत निवडणुकीतील पैशांच्या खेळावर गंभीर आरोप केले.
Raj Thackeray addresses a joint rally with Uddhav Thackeray, exposing alleged cash-for-votes politics in Maharashtra.
Raj Thackeray addresses a joint rally with Uddhav Thackeray, exposing alleged cash-for-votes politics in Maharashtra.Saam Tv
Published On

एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज राज आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा सुरू असून या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी थेट मनसे उमेदवारांना स्टेजवर बोलावत निवडणूक प्रक्रियेत सुरू असलेल्या कथित पैशांच्या खेळावर गंभीर आरोप केले. राज ठाकरे म्हणाले सोलापूरला आमच्या विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून करण्यात आला. फॉर्म मागे घेण्यासाठी इथपर्यंत हे सरकार आलं आहे. पोलीस हताश झालेत, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे?

प्रचारादरम्यान मतांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले पाच-पाच हजार रुपयांना मते विकली जात आहेत. दोन-तीन माणसांची नावं घेतोय, बाकीचेही पुढे येतील. यानंतर त्यांनी शैलेश धात्रक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पूजा धात्रक आणि मनीषा धात्रक यांना स्टेजवर बोलावले. एका कुटुंबातील तिघांना मिळून तब्बल १५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. तरीही त्यांनी ती नाकारून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,” असे राज ठाकरे म्हणाले. पंधरा कोटींची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच-पाच हजारांत मते विकणारी कुठे,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray addresses a joint rally with Uddhav Thackeray, exposing alleged cash-for-votes politics in Maharashtra.
एकेकाळची ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात, ठाकरेंसाठी मुंबईत दारोदारी करतेय प्रचार

त्यानंतर राजश्री नाईक यांना स्टेजवर बोलावण्यात आले. त्यांना पाच कोटी रुपयांची ऑफर होती, तीही त्यांनी नाकारली. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. सुशील आवटे यांनाही स्टेजवर बोलावण्यात आले. त्यांनाही एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. ती त्यांनी नाकारली अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

Raj Thackeray addresses a joint rally with Uddhav Thackeray, exposing alleged cash-for-votes politics in Maharashtra.
अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी; अजित पवारांच्या नेत्याची उपनगराध्यक्षपदी निवड

शेवटी राज ठाकरे म्हणाले, अजून बरेच जण आहेत. हा पैसा कुठून येतो? काय चाललंय राज्यात? किती पैसे वाटायचे? असा सवाल करत त्यांनी संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभास्थळी ठाकरे बंधूंच्या या भूमिकेला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com