Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाला आजपासून पुन्हा सुरूवात होणार आहे. विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
MAHARASHTRA RAIN UPDATESaam Tv
Published On
  • राज्यात आजपासून पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं

  • आजपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे

  • कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

  • तर उर्वरीत राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात जुलैच्या पहिल्या ६ दिवसांत पावसाने हाहाकार केला होता. पण त्यानंतर म्हणावा तसा पाऊस पडला नाही. पावसाने उघडीप घेतल्यामुळे आणि उकाडा वाढल्यामुळे सर्वजण चिंतेत आले होते. पण आता गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात मात्र हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके लागणार असून उकाडा कायम राहिल.

Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

आज कोकणातील ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा याठिकाणी आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Pune Rain: पुण्यातील पावसाचा फटका रेल्वेसेवेवर, १४ ट्रेन रद्द तर ५ गाड्याच्या मार्गात बदल; वाचा संपूर्ण लिस्ट

तर ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचसोबत अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ज्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे त्याठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Rain Alert: विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, आजपासून पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Rain Alert: पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com