राज्यात दिवसा ऑक्टोबर हिटचा तडाखा आणि रात्री गारवा असा अनुभव नागरिकांना येत आहे. यात आता पावसाची भर पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकण किनारपट्टीवर 3 दिवस मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Marathi News)
राज्यातील तापमानात मागील काही दिवसांपासून चढ उतार होत आहेत. सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला होता.
त्यानुसार कराड तालुक्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे ऊसतोडीवर परिणाम झाला आहे. मात्र हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उद्या म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. बुधवारी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.