Mahad MIDC News: महाड MIDC दुर्घटना! ८ कामगारांच्या मृतदेहांची ओळख पटेना; DNA चाचणी होणार

Mahad MIDC Blast Update: या स्फोटामध्ये आत्तापर्यंत ८ जणांचे मृतदेह सापडले असून ३ बेपत्ता कामगारांचा ३२ तासांनंतरही शोध सुरू आहे.
Mahad MIDC News
Mahad MIDC NewsSaamtv
Published On

सचिन कदम, प्रतिनिधी

Mahad MIDC Blast Update:

रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी येथील ब्लू जेट हेल्थकेअरमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये आत्तापर्यंत ८ जणांचे मृतदेह सापडले असून ३ बेपत्ता कामगारांचा ३२ तासांनंतरही शोध सुरू आहे. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची ओळख पटणे शक्य नसल्याने DNA तपासणीचा आधार घेतला जाणार आहे. पनवेल येथे मृतदेहांचे शवविच्छेदन करुन नमुने DNA तपासणीसाठी मुंबई येथील लॅबला पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाड एमआयडीसीतील (Mahad MIDC) ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला. वायू गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ३ कामगार अद्यापही बेपत्ता आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही या कामगारांचा शोध घेण्यास बचाव पथकाला अपयश आले.

कंपनीत झालेल्या स्फोटामुळे इमारत धोकादायक बनल्याने बेपत्ता कामगारांचे शोधकार्य करणाऱ्या बचाव पथकाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळेच शोधकार्य तांत्रिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील शोधकार्यात यंत्रसामग्रीचा वापर केला जाईल.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahad MIDC News
Beed News: 'कार्यालयावरील हल्ला राजकीय हेतूने..' तालुकाध्यक्ष कुंडलिक खांडे यांचा दावा; कारवाई करण्याची मागणी

या स्फोटात आत्तापर्यंत ८ जणांचे मृतदेह सापडले आहेत. परंतु आग आणि स्फोटांमुळे मृतदेहाची ओळख पटवण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणीचा (DNA Test) आधार घेतला जाणार आहे.

मृताशी थेट रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीचे डीएनए तपासणीसाठी घेतले जाणार असून हे नमुने डीएनए तपासणीसाठी मुंबईच्या (Mumbai) लॅबला पाठवले जाणार आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट येण्यासाठी तीन ते सात दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मृतदेह पनवेल शासकिय रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Mahad MIDC News
Mark Zuckerberg Injury: मार्शल आर्ट्स आलं अंगाशी, मार्क झुकरबर्गचा मोडला पाय; रुग्णालयात दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com