सचिन कदम, साम टीव्ही
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी दुपारसच्या सुमारास एक भयानक घटना घडली. महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कसा झाला? याबाबत एका कामगाराने माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कंपनीच्या ज्या प्लांटमध्ये हा स्फोट झाला, त्या ठिकाणी २५ ते ३० कामगार काम करीत होते. या प्लांटमध्ये पावडर ड्राइंगचे काम केले जात होते. दुपारच्या सुमारास कामगार काम करत असताना तिथे अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की मोठा आवाज झाला. काही कळण्याच्या आत सर्व गॅस बाहेर आला. (Latest Marathi News)
प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी जीवाच्या आकांताने बाहेर धाव घेतली. मी देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो. मात्र, आमच्यासोबत काम करणाऱ्या काही कामगारांना बाहेर पडता आले नाही. कदाचित गॅसमुळे ते बेशुद्ध झाले असावे, असा थरकाप उडवणारा प्रसंग स्फोटातून वाचलेल्या कामगाराने सांगितला.
दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कंपनीत अडकलेल्या काही कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही काही कामगार प्लांटमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.