Ajit Pawar News : माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं, अजितदादांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

Political News : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार यांनी आज काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV
Published On

सचिन जाधव

Baramati News :

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे असं त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नेहमीच वाटतं. अनेकदा ते पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यमातून आपली इच्छा व्यक्त करत असतात. अजित पवार यांनीही आपली मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा बोलून दाखवली आहे. मात्र आता अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा व्यक्त केली आहे.

अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं का? या प्रश्नावर बोलाताना त्यांनी म्हटलं की, अजितदादांवर लोकांचा खूप प्रेम आहे. पण पुढचं काय सांगावं. सर्वांना वाटतं अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे. माझंही आता वय झालं आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यांसमोरच दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आशाताई पवार यांनी बोलून दाखवली. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Grampanchayat Election 2023 : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; अनेक बड्या नेत्यांची प्रतीष्ठा पणाला, काटेवाडीत अजितदादा विरुद्ध भाजप

पुढे त्यांनी म्हटलं की, अजित पवार आजारी आहेत, त्यांना अशक्तपणा आला आहे. काटेवाडीत काहीच नव्हतं तेव्हापासून मतदान करत आहे. आता काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. लोकांचंही येथून खूप प्रेम मिळतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार मतदानाला येणार नाहीत

अजित पवार यांची तब्येत ठीक नाही. त्यांना डेंग्यची लागण झाली आहे. त्यामुळे अजित पवार आज काटेवाडीत मतदान करण्यासाठी येणार नाहीत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार यांनी आज काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.

अजित पवार विरुद्ध भाजप

पुणे जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. काटेवाडीत ग्रामपंचायतीच्या सर्व १६ जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com