Grampanchayat Election 2023 : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; अनेक बड्या नेत्यांची प्रतीष्ठा पणाला, काटेवाडीत अजितदादा विरुद्ध भाजप

Political News : आज सकाळी ७.३० वाजता मतदान सुरु होणार आहे. तर संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान करत येणार आहे.
Grampanchayat Election
Grampanchayat ElectionSaam tv
Published On

Grampanchayat Election 2023 :

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २३५९ ग्रामपंचायती आणि आणि २९५० सदस्यपदाच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी ७.३० वाजता मतदान सुरु होणार आहे. तर संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान करत येणार आहे.

गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबरला होणार आहे.तर गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. (Latest Marathi News)

अजित पवार विरुद्ध भाजप

पुणे जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. काटेवाडीत ग्रामपंचायतीच्या सर्व १६ जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Grampanchayat Election
Assembly Election Survey: MP, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कोणाची येणार सत्ता? सर्वेक्षणामुळे भाजपची चिंता वाढली

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख लढती

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी खुर्द गावातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. गुलाबराव पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडत आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या अमळनेरमध्ये १३ महत्त्वाच्या ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.

नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचयातींमध्ये काळे विरुद्ध कोल्हे अशी पारंपरिक लढत पाहायला मिळेल. संगमनेर तालुक्यातील ४ ग्रामपंचायत निवडणुकीत विखे विरुद्ध काँग्रेसचे थोरात असा सामना दिसेल. कर्जत- जामखेड मतदारसंघातील ८ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. इथे भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढत दिसेल.

Grampanchayat Election
Devendra Fadnavis on Narcotics : ड्रग्स प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांना बडतर्फ करणार : देवेंद्र फडणवीस

रायगडमध्ये महायुती विरुद्ध इंडिया आघाडी सामना

रायगड जिल्ह्यात सरपंच पदाच्या १६८ आणि १७७ ग्रामपंचायतींच्या १२४६ सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. रायगड जिल्ह्यात महायुती विरुद्ध इंडिया आघाडी सामना होत आहे. सुनील तटकरे, जयंत पाटील, अनंत गीते, भरत गोगावले यांची प्रतिष्ठा रायगडमध्ये पणाला लागली आहे. जिल्ह्यात २१० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी सरपंच पदाच्या 38 आणि 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आज होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com