Assembly Election Survey: MP, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कोणाची येणार सत्ता? सर्वेक्षणामुळे भाजपची चिंता वाढली

Election Survey : MP, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कोणाची येणार सत्ता? सर्वेक्षणामुळे भाजपची चिंता वाढली
Shivraj Singh Chouhan, Ashok Gehlot, Bhupesh Baghel
Shivraj Singh Chouhan, Ashok Gehlot, Bhupesh BaghelSaam Tv
Published On

MP, Rajasthan, Chhattisgarh Survey: 

तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या सर्व राज्यांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्या तरी देशभरातील लोकांचे लक्ष हे तीन राज्यांवर लागले आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुका पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील सेमीफायनल मानल्या जात आहेत. अशातच नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे, ज्यात जनतेने आपला कल स्पष्ट केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivraj Singh Chouhan, Ashok Gehlot, Bhupesh Baghel
Maharashtra Reservation GR: मराठा आरक्षणसाठीच्या आधीच्या आणि आताच्या GR मध्ये काय फरक? जाणून घ्या

मध्य प्रदेशात कमळ की कमलनाथ?

मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 116 आकडा पार करावा लागेल. सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी फायनल सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणानुसार, राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकते. काँग्रेस 230 पैकी 118 ते 130 जागा जिंकू शकते, असं यात संगणयत आलं आहे. तर भाजपला 99 ते 111 जागा आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात. राज्यात काँग्रेसला 44 टक्के मते मिळू शकतात. तर भाजपला 42 टक्के आणि इतरांना 14 टक्के मते मिळू शकतात. (Latest Marathi News)

राजस्थानमध्ये कोणाचे येणार सरकार?

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 101 चा आकडा गाठणं महत्वाचं आहे. सर्वेक्षणानुसार, राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करू शकते. भाजप 200 जागांपैकी 114 ते 124 जागांवर विजय मिळू शकते. तर काँग्रेसला 67 ते 77 जागा आणि इतरांना 0 ते 13 जागा मिळू शकतात. राजस्थानमध्ये भाजपला 45 टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला 42 टक्के आणि इतरांना 13 टक्के मते मिळू शकतात.

Shivraj Singh Chouhan, Ashok Gehlot, Bhupesh Baghel
Rajasthan Election: राजस्थानमध्ये भाजपला धक्का, बड्या नेत्याने सोडला पक्ष; काय आहे कारण?

छत्तीसगडमध्ये कमळ फुलणार की काँग्रेस जिंकणार?

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 46 चा आकडा पार करावा लागेल. सर्वेक्षणानुसार, राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकते. काँग्रेस 90 जागांपैकी 45 ते 51 जागा काबीज करू शकते. तर भाजपला 36 ते 42 जागा आणि इतरांना 2 ते 5 जागा मिळू शकतात. राज्यात काँग्रेसला 45 टक्के मते मिळू शकतात. तर भाजपला 43 टक्के आणि इतरांना 12 टक्के मते मिळू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com