Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?

Maharashtra Weather Update: राज्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गणरायाच्या आगमनासोबत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On: 
  • गणरायाच्या आगमनासोबत महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर पकडला

  • बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली

  • मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह अनेक भागात पावसाने हजेरी लावली

  • आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

गणरायाच्या आगमनासोबत दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केले. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरा मध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात पावसाने जोर धरला आहे. रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. कोकणासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आज देखील हवामान खात्याने अनेक जिल्ह्यात हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?
Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिक चिंतेत आले होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे सावट आहे. पाऊस नसल्यामुळे पिकं करपून चालली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात आहे. अशातच आता गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. पुढच्या काही दिवस असाच पाऊस कायम राहावा अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?
Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

दरम्यान, भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) मान्सूनोत्तर हंगामानत ३ मोठी चक्रीवादळे तयार होण्याचा इशारा दिला आहे. गेल्या ४४ वर्षांत आलेल्या चक्रीवादळापेक्षा मोठा तडाखा बसण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केली. मान्सूनोत्तर हंगामात उत्तर हिंद महासागरात ३ चक्रीवादळे तयार होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रात ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. विदर्भातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारला असल्याची माहिती समोर आली आहे.

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?
Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com