Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update Today News : गणरायाच्या आगमनाआधी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असून नंदुरबार, धुळे आणि नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Update Today News
Maharashtra Rain Update Today News AI Image
Published On
Summary
  • महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

  • नंदुरबार, धुळे आणि नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट

  • मुंबईसह पालघर, ठाणे, जळगाव, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासाठी येलो अलर्ट

  • अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

गणरायाचं आगमन अवघ्या १ दिवसावर असताना राज्यभरात त्याच्या स्वागताला पावसाने काल रात्रीपासूनच हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर जाणवू लागला आहे. या हवामान प्रणालीला पूरक परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD ने आज मुंबईसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. तर नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील काही भागांत कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Update Today News
NCMC Card चा रिचार्ज संपलाय? २ मिनिटात घरबसल्या ऑनलाईन रिचार्ज करण्यासाठी 'या' ६ स्टेप्स करा फॉलो

दरम्यान, उत्तर कोकण आणि उत्तर मराठवाड्यातही हवामान बदलण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, नाशिक, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update Today News
Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

पावसासोबत काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एकूणच, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनासह नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com