

रायगड जिल्हा परिषदेत 49 जागांचे निकाल जाहीर
अजित पवार गट आणि शिंदे सेना प्रत्येकी 16 जागांसह आघाडीवर
भाजप तिसऱ्या क्रमांकावर; ठाकरे गट व काँग्रेसचे खाते उघडले
रायगड जिल्हा परिषदेवर काही वर्षापुर्वी सत्ता गाजावणाऱ्या शेकापची पिछेहाट होताना दिसत आहे. आत्तापर्यंत 59 जागांपैकी 49 जागांचे निकाल हाती आले. यामध्ये शिंदे सेनेला 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 16, भाजप 11, ठाकरे गटाला 5 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. अजुनही 10 जागांचे निकाल हाती येणं बाकी आहे. मात्र हाती आलेल्या या निकालात ठाकरे गटाने 5 तर काँग्रेस ने 1 जागा मिळवून खातं उघडलंय. मात्र शेकाप अद्याप भोपळ्यात आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर शेतकरी कामगार पक्षाच्या भवितव्यासाठी हे चित्र धोकादायक ठरणार असेल.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ५९ निवडणूक विभाग आणि १५ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण ११८ पंचायत समिती वॉर्ड आहेत. दरम्यान २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप पक्ष २१ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी पक्ष होता, त्यावेळी राष्ट्रवादीनं १७ जागा जिंकल्या होत्या.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं , आज निकाल जाहीर केला जात आहे.
दरम्यान रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदकरिता 59 जागा तर पंचायत समिती करिता 118 जागांसाठी लढत होती. या निवडणुकीत 11 लाख 88 हजार 804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 69.91 टक्के मतदान झाले होतं. सर्वाधिक मतदान कर्जत आणि उरण मध्ये तर त्या खालोखाल खालापूर, पेण आणि अलिबाग मध्ये झाल्याची नोंद झाली होती.
रायगड अपडेट
जिल्हा परिषद
एकूण जागा 59
जाहीर निकाल 49
भाजप - 11
शिवसेना - 16
राष्ट्रवादी काँग्रेस - 16
शिवसेना ubt - 5
काँग्रेस - 1
शेकाप 0
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.