Raigad News: रिव्हर राफ्टिंगला गेला अन् परत आलाच नाही, मुंबईतल्या इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

Engineer Died After River Rafting: रायगडमधील कुंलडलिका नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करत असताना मुंबईच्या इंजिनअरचा मृत्यू झाला आहे. रिव्हर राफ्टिंग करून बाहेर पडत असताना पर्यटकाचा मृत्यू झाला.
Raigad News: रिव्हर राफ्टिंगला गेला अन् परत आलाच नाही, मुंबईतल्या इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
Engineer Died After River RaftingSaam Tv
Published On

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये (Raigad) रिव्हर राफ्टिंग (River Rafting) करताना एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात ही घटना घडली आहे. मुंबईवरून पर्यटनासाठी आलेल्या इंजिनअरचा मृत्यू झाला आहे. रिव्हर राफ्टिंग करून बाहेर पडत असताना पर्यटकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Raigad News: रिव्हर राफ्टिंगला गेला अन् परत आलाच नाही, मुंबईतल्या इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
Raigad Accident: रायगडमध्ये २ एसटी बसची समोरासमोर धडक, चालकांसह १५ ते २० प्रवासी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊन नदीतून बाहेर पडत असताना एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे घडली. अभिजीत कुलकर्णी असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. अभिजीत वांद्रे येथील वीज वितरण कंपनीमध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Raigad News: रिव्हर राफ्टिंगला गेला अन् परत आलाच नाही, मुंबईतल्या इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
Raigad Accident: एसटी बसचा भीषण अपघात, ९ विद्यार्थी जखमी

अभिजीत कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासह कोलाड येथे पावसाळी पर्यटनासाठी आले होते. शनिवारी त्यांनी कुंडलिका नदी पात्रात रिव्हर राफ्टिंग केली आणि नदी पात्रातून बाहेर पडत असताना ते खाली कोसळले. त्यांना लगेच नदीतून बाहेर काढण्यात आले आणि रोहा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी अभिजीत कुलकर्णी यांना मृत घोषित केले.

Raigad News: रिव्हर राफ्टिंगला गेला अन् परत आलाच नाही, मुंबईतल्या इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
Nagar Manmad Highway Accident : योजनेचा लाभ घेण्याची इच्छा अधुरीच राहिली; तहसील कार्यालयाकडे जाताना वाहनाने उडवले, महिला जागीच ठार

या प्रकरणी कोलाड पोलिस ठाण्यात अभिजीत कुलकर्णी यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून कोलाड पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पावसाळ्यात पर्यटनस्थळी जात असताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसंच, लोणावळ्यातील भुशी डॅम दुर्घटनेनंतर पुणे, रायगड, ठाणे जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील जीव धोक्यात घालून पर्यटक सहकुटुंब याठिकाणी जात आहेत.

Raigad News: रिव्हर राफ्टिंगला गेला अन् परत आलाच नाही, मुंबईतल्या इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; कारचा अक्षरश: चक्काचूर, एकाच कुटुंबातील तिघे ठार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com