सचिन कदम
कर्जतमधील नेरळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु असताना मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतापले आहेत. संतप्त नातेवाईकांनी थेट येथील रुग्णालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केलीये.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेरळमधील रायगड हॉस्पीटलमध्ये एक १६ वर्षीय मुलगा अॅडमीट होता. आजारी असल्याने त्याच्यावर एक शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने मुलाचा मृत्यू झालाय, असा दावा त्याचे नातेवाईक करत आहेत.
रोहीत गवळी असं मृत १६ वर्षीय मृत मुलाचं नाव आहे. तो कर्जत तालुक्यातील मानिवली येथील रहिवासी होती. मुलाच्या मृत्यूनंतर मंगळवारी रात्री नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. संतप्त नातेवाईकांनी संगणक तसेच खिडक्यांचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे.
पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना समज दिली. पोलिसाच्या हस्तक्षेपानंतर सध्या वातावरण शांत आहे.
रोहीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. तेथील अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे पोलीसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.