रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दणका; शेकडो घरांचे नुकसान, 12 जणांचा मृत्यू

Raigad Flood Crisis : मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालाय. यात बारा जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
Raigad Hit By Torrential Rains: 12 Dead, Hundreds Of Homes Damaged In Major Disaster
Raigad Hit By Torrential Rains: 12 Dead, Hundreds Of Homes Damaged In Major Disastersaamtv
Published On
Summary
  • रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

  • रायगड पावसामुळे 12 जणांचा मृत्यू

  • मुसळधार पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून जीवितहानीसह खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झालंय. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत आपत्तीमुळे 12 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी आणि 1 व्यक्ती बेपत्ता आहे. यासह 46 मोठी जनावरे, 176 लहान जनावरे आणि 11436 कोंबड्या व पक्षी मृत अथवा बाधित झालेत.

Raigad Hit By Torrential Rains: 12 Dead, Hundreds Of Homes Damaged In Major Disaster
Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

रायगड जिल्ह्यात 3 पक्की आणि 54 कच्ची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तर 1070 पक्की आणि 214 कच्ची घरे अंशतः बाधित झाली आहेत. यासह 5 झोपड्या आणि 86 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल 4913 घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. व्यावसायिक नुकसानीमध्ये 20 पोल्ट्री, 30 दुकाने, 437 गणपती कारखाने आणि 254 दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची कारवाई सध्या वेगाने सुरू आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये 47 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झालंय. यात कर्जत आणि रोहा येथील मंदिरे, महाडमधील शाळा व स्मशानभूमी, उरणमधील शाळा, पोलादपूरमधील स्मशानभूमी व शाळा, पेणमधील आरोग्य केंद्र, शाळा व गोशाळा, तसेच खालापूर, सुधागड, तळा आणि मुरुड येथील शासकीय व सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे.

Raigad Hit By Torrential Rains: 12 Dead, Hundreds Of Homes Damaged In Major Disaster
Rain Alert: मुंबईसह ठाणे अन् पालघरला पाऊस झोडपून काढणार, १० जिल्ह्यांना अलर्ट जारी; कुठे कसं हवामान?

जिल्ह्यात एकूण १२ व्यक्तींचा मृत्यू, ३ व्यक्ती जखमी

पनवेल: पांडवकडा धबधबा येथे 2 (3 जुलै रोजी वाहून गेलेले 2 मृतदेह प्राप्त), आपटा येथे 1, दिघाटी येथे 1 आणि वाघाचीवाडी येथे 2 (1 जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू) अशा 6 व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला.

कर्जत: नेरळ (टपालवाडी धबधबा) 1, बेडीसगाव (भगीरथ धबधबा) 1 आणि भागुचीवाडी (मासेमारी करताना) 1 अशा 3 व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला.

महाड: कुसगाव येथे 1 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता, तर कांबळे बिरवाडी येथे 1 व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला.

खालापूर: सुभाषनगर येथे दरड कोसळून 3 व्यक्ती जखमी, तर बोरघाट येथे झाड काढताना 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अलिबाग: वेलवली खानाव येथे 1 व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com