Diveagar Tragedy : हट्टापायी एकुलत्या एक मुलाला पिकनिकला पाठवलं, पण...; सुमितच्या जाण्याने आई-वडील रडून रडून बेहाल

Raigad Student Diveagar Tragedy News : रायगडच्या दिवेआगर येथे समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सहलीदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेने आळंदीवर शोककळा पसरली असून घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Diveagar Tragedy: 8 Students Drown During Trip In Raigad
Diveagar Tragedy: 8 Students Drown During Trip In RaigadSaam Tv
Published On: 
Summary
  • रायगडच्या दिवेआगर येथे सहलीदरम्यान समुद्रात बुडून ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

  • मृत विद्यार्थ्यांमध्ये सुमितचा समावेश असून तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा

  • दुर्घटनेनंतर विनर्स अकॅडमीविरोधात गुन्हा दाखल

एकुलत्या एक मुलाने सहलीचा हट्ट केला आणि आईबाबांनी देखील कसलाही विचार न करता तो पूर्ण केला. मात्र आपला मुलगा त्या सहलीवरून परत येणार नाही ही कल्पना देखील आई वडील करू शकत नाहीत. अशीच एक दुर्दैवी घटना रायगडच्या दिवेआगर येथे घडली. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ८ मुलांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये असलेल्या सुमित अहिरेच्या आई वडिलांनी सांगितले की, सुमित आमचा एकुलता एक मुलगा होता. तो विनर्स अकॅडमीत अकरावीचं शिक्षण घेत होता. त्याचं इंजिनिअर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो JEE परीक्षेची तयारी करत होता. काही दिवसांपूर्वीच सुमितचा वाढदिवस झाला होता. कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट न करणाऱ्या सुमितने यावेळी मात्र दिवेआगरच्या सहलीला जाण्याचा हट्ट केला होता. उत्साहाने घराबाहेर पडलेली त्याची पावलं पुन्हा घरी परतलीच नाहीत.घरी परतला तो फक्त सुमितचा मृतदेह.

Diveagar Tragedy: 8 Students Drown During Trip In Raigad
Political News : शिंदेंसेनेच्या बड्या नेत्यासह ७ जणांवर गुन्हा, नामांकित हॉस्पिटलच्या संचालकाकडे १२ लाखांची खंडणी मागितली

या दुर्घटनेनंतर सहलीला गेलेल्या विद्यार्थिनी श्रद्धा भोकरे हिने प्रत्यक्षदर्शी अनुभव सांगितला. तिच्या म्हणण्यानुसार, समुद्रात गेल्यानंतर शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत होते. मात्र, समुद्रात मोठा खड्डा असल्याचं लक्षात आलं. त्याचवेळी अचानक मोठी लाट आली आणि काही क्षणांत विद्यार्थ्यांवर डोक्यावरून पाणी गेलं.

Diveagar Tragedy: 8 Students Drown During Trip In Raigad
Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! देवीची मूर्ती नेताना पिकअपला ट्रकची धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि ८ जण बुडाले. दरम्यान दुर्घटनेनंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. रात्री उशिरा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह आळंदीतील त्यांच्या घरी आणण्यात आले. पार्थिव घरी पोहोचताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. एकाच दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने आळंदीवर शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आळंदीत अत्यावश्यक सेवा वगळता बंद पाळण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com