Rahuri By-Election: भाजपनं राहुरीत कोणाला दिली उमेदवारी? नावाची अधिकृत घोषणा

Rahuri By-Election: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कार्डिले यांना भाजपकडून उमेदवारी दिली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.
Rahuri By-Election:
CM Devendra Fadnavis Saam tv
Published On
Summary
  • शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते.

  • शिवाजीराव कर्डिले हे 'राजकारणातील किमयागार' म्हणून ओळखले जात

  • शिवाजीराव कर्डिले यांनी ग्रामीण भागातील विकासकामांना गती दिली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने अक्षय कार्डिले यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. अक्षय कार्डिले हे दिवंगत शिवाजी कार्डिले यांचे सुपुत्र आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवाजी कार्डिले यांचे निधन झाले, त्यानंतर पक्षाने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली.

Rahuri By-Election:
राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. माजी खासदार सुजय विखे पाटील देखील इच्छुक होते. तिकिट मिळवण्याकरिता मोठी ताकद लावली होती. या पोट निवडणुकीसाठी आपणच पहिल्या क्रमांकाची पसंती असल्याचे सुजय विखे पाटील सांगत होते. त्यामुळे राहुरीच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या भूमिकेविषयी कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र आता उमेदवारीबाबत चित्र स्पष्ट झालं असून भाजपच्या डावासमोर विरोधक चेकमेट झाले आहेत.

Rahuri By-Election:
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी शिवाजीराव कर्डिले यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. आता भाजपनं त्यांच्या सुपूत्रालाच उमेदवारी आहे, त्यामुळे विरोधकांचे टेन्शन वाढलंय. शिवाजीराव कर्डिले हे 'राजकारणातील किमयागार' म्हणून ओळखले जात. कोणत्याही लाटेत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही प्रमुख पक्षांतून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.

शिवाजी कार्डिले २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. २०१४ च्या विधानसभा निवडणुका जिंकून त्यांनी पुन्हा यश मिळवले. मात्र, २०१९ च्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com