Accident News : पुणे - शेगाव बसला अपघात; स्थानिक धावले जखमींच्या मदतीला

याच मार्गावर तीन दिवसात दोन लक्झरी बसला अपघात झाल्याची माहिती समाेर आली आहे.
Accident News , Pune , Shegoan , Shegoan Khamgoan Highway
Accident News , Pune , Shegoan , Shegoan Khamgoan HighwaySaam tv

Buldhana News : शेगाव - खामगाव महामार्गावर खाजगी लक्झरी बस (bus) व वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर यांच्यात आज (साेमवार) अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. पाेलीस (police) या अपघाताचा तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

खाजगी बस पुण्याहून शेगावच्या दिशेने निघाली हाेती. या बसला शेगाव - खामगाव महामार्गावर समोरून येणा-या वाळू्च्या टिप्परनं धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने या सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. त्या सर्वांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Buldhana Latest Marathi News)

Accident News , Pune , Shegoan , Shegoan Khamgoan Highway
Karde Beach : कर्दे समुद्रात बुडालेल्या पाचगणीतील युवकाचा मृतदेह सापडला; पाच जणांचा वाचला जीव

या अपघातानंतर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा वाहन चालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पाेहचले. काही लाेकांकडून त्यांनी अपघाताची माहिती दिली. दरम्यान याच मार्गावर तीन दिवसात दोन लक्झरी बसला अपघात झाल्याची माहिती समाेर आली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Accident News , Pune , Shegoan , Shegoan Khamgoan Highway
Earthquake : भूकंपाच्या लागोपाठ २ धक्क्यांनी ग्रामस्थ भयभीत; प्रशासन सतर्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com