Maharashtra Politics: पुण्यात थेट अजित पवार विरुद्ध भाजप; स्थानिक निवडणुकांमध्ये रंगणार थरारक लढत

Pune District Municipal And Panchayat Elections: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
Ajit Pawar addressing party workers in Pune ahead of the local body elections where NCP is set to face BJP directly.
Ajit Pawar addressing party workers in Pune ahead of the local body elections where NCP is set to face BJP directly.Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यात नगरपरिषद,जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या असून पुणे जिल्ह्यातील एकूण 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार असून जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत न होता प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचं चित्र पाहायला मिळत असून जिल्ह्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायत मध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत होताना पाहायला मिळणार आहे.

Ajit Pawar addressing party workers in Pune ahead of the local body elections where NCP is set to face BJP directly.
मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

पुण्यातील शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात बैठका सुरू असून यासाठी भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत भोरच्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निर्मला आवारे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आलं आहे.

Ajit Pawar addressing party workers in Pune ahead of the local body elections where NCP is set to face BJP directly.
Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

यावेळी आमदार शंकर मांडेकर म्हणाले की, आज आम्हाला आनंद होत आहे की भोरच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी चर्चा सुरू होती आणि आज त्यांनी विकासाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भोरमध्ये आत्ताची भाजप म्हणजे थोपटे यांची भाजप असून आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढणार आहोत. पक्षाने स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला असून भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे.

Ajit Pawar addressing party workers in Pune ahead of the local body elections where NCP is set to face BJP directly.
पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जवळपास ३५ जणांचे पक्ष प्रवेश झाले आहे. जे नवीन भाजपमध्ये आले आहे त्यांना आम्ही स्वीकारत नसून जुने भाजपचे लोक आमच्या सोबत आहे.आमची लढाई थोपटेंची भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.

Ajit Pawar addressing party workers in Pune ahead of the local body elections where NCP is set to face BJP directly.
भाजपात जोरदार इनकमिंग; बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ

यावेळी निर्मला आवारे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस विकासाचा पक्ष असून मला भोरमध्ये काही काम करायचं असून यासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुणे जिल्ह्यातील एकूण 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार असून बारामती लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे, फुरसुंगी-उरळी देवाची ‘ सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरुनगर, मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये थेट अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com