Manoj Jarange patil
Manoj Jarange threat CaseSaam tv

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

Manoj Jarange threat Case : मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ समोर आला .
Published on
Summary

मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात आरोपी दादा गरुडचा कबुली व्हिडिओ समोर

व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे आणि आरोपींची बैठक झाल्याचा दावा

या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

दुसरीकडे मुंबई पोलिसांची मनोज जरांगे आणि विरेंद्र पवार यांना तपासासाठी नोटीस

योगेश काशिद, साम टीव्ही

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्यात दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेत नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता आरोपीचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मनोज जरांगे हत्येच्या कट प्रकरणी गेवराईच्या अमोल खुणे याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीने धक्कादायक खुलासे केले. तिने पती निर्दोष असल्याचे सांगितलं आहे. माझ्या पतीला या प्रकरणात फसवल्याचा पत्नीचा दावा आहे. त्यानंतर आता या घटनेतील दुसऱ्या आरोपीचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपी दादा गरुडचा हा व्हिडिओ आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला होता. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि आरोपींची परळीतील शासकीय विश्रामगृहात बराच वेळ बैठक झाल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला होता. याबाबतचा कबुली देतानाचा आरोपी दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही कबुली देतावेळी त्या ठिकाणी आयबीचे (INTELLIGENCE BURO) अधिकारी उपस्थित असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

Manoj Jarange patil
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने साथ सोडली, 'घड्याळ' हाती बांधलं

व्हिडिओमध्ये दादा गरुड सांगत आहे की, परळीतील शासकीय विश्रामगृहात परळीतील अनेक रथी महारथी बसलेले होते. मात्र तिथे अमोल खुणे आणि कांचन साळवे गेल्यानंतर त्यांच्यासोबत धनंजय मुंडे 25 मिनिटे दुसऱ्या खोलीत बसले होते'. हत्येचा कट रचल्याप्रकरणी आता आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे. या प्रकरणात पोलीस आणखी काय कारवाई करतात, हे पाहावे लागले.

Manoj Jarange patil
नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस

दुसरीकडे मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांनी नोटीस धाडली आहे. यामुळे जरांगेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनोज जरांगे पाटील आणि विरेंद्र पवार यांना मुंबई पोलीसांनी नोटीस पाठवली आहे. मार्च महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com