MLC Election Results: विधानपरिषदेत शरद पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी, शिंदेंच्या सरदाराची पवारांना साथ

Maharashtra Vidhan parishad nivadnuk nikal : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना यश मिळाल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar saam tv
Published On: 

मराठवाड्यात शिंदेंच्या आमदारानं थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्यानं महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण याचं गणित कसं बिघडलयं... विधानपरिषदेत दोन जागांवर विजय मिळत पवारांनी कशी 'पॉवर' दाखवलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शरद पवारांची पॉवर पाहायला मिळालीय...मराठवाडा पदवीधर मतदारसंघानं अनेकाचं लक्ष वेधून घेतलंय...शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाजीनगरमधील पदवीधरचे उमेदवार डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मतमोजणीत आघाडी घेत महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाणांना मागे सोडलयं....मात्र प्रतापसिंह पाटलांच्या विजयामागे थेट पवार पॉवरचा करिष्मा दिसतोय...तो कसा पाहूयात...

दादांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाणांना महायुतीकडून संभाजीनगरच्या पदवीधरची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐन निवडणुकीत शिंदेसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा जाहीर केला...

त्यात ठाकरेसेनेनं दिलीप घुगेंना अधिकृत उमेदवारी देऊनही ठाकरेसेनेचे आमदार आणि प्रतापसिंह पाटलांंचे लहान भाऊ राहुल पाटील यांनीही प्रतापसिंह पाटलांना जाहीर पाठिंबा दिला. तर काँग्रेस खासदार कल्याण काळेंनीही प्रतापसिंह पाटलांना निवडणुकीत पाठिंबा दिला. पवारांच्या राष्ट्रवादीनं जुळवलेली ही समीकरणं आणि गेल्या १८ वर्षांपासून आमदार असलेल्या सतीष चव्हाणांविरोधातल्या प्रस्थापितविरोधी लाटेचा प्रतापसिंहांना मोठा फायदा झालाय.

Sharad Pawar
मराठवाडा पदवीधरमध्ये दादांच्या NCPला फटका, शिंदेंची ताकद वाढली, दादांच्या राष्ट्रवादीचं काय?

दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघातही पवारांची पॉवर पाहयाला मिळालीय. पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीनं स्मिता जाधव यांना तर मविआनं हर्षदा देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मविआत या मतदारसंघात बंडखोरी न झाल्यानं आणि थेट लढतीमुळे हर्षदा देशमुखांना मविआच्या एकजुटीचा विजयासाठी फायदा झाला.

Sharad Pawar
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नका, संजय गायकवाडांचा महामुर्खपणाचा सल्ला

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जाळ या निवडणुकीत निर्णायक ठरलं. शरद पवार यांच्या राजकीय धोरणाचा आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या समन्वयाचा फायदा मविआच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांना झाला. दरम्यान विधानपरिषदेत दोन्हीही जागांवरच्या निर्णायक आघाडीमुळे हा पवारांच्या राष्ट्रवादीसाठी टर्निंग पॉईंट असेल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलाय.

एकीकडे शरद पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीकडून जागा खेचून आणली तर दुसरीकडे पुण्यात भाजपवर विजय मिळवला. या निकालामुळेपवारांच्या राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पवारांना शिंदेंच्या सरदाराची साथ लाभल्यामुळे महायुतीत भडका उडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरहून माधव सावरगावेसह, सागर आव्हाड, पुणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com