

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर दादांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आलीय... प्रफुल्ल पटेलांनी तर थेट पक्षनेतृत्वालाच आत्मपरिक्षणाचा सल्ला दिलाय.. मात्र राष्ट्रवादीत नाराजीनाट्य कसं रंगलयं...पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून...
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या पराभवामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलयं...एकाच जागेवर पूर्ण ताकदीने उतरूनही सतीश चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागल्याने, आता पक्षांतर्गत अस्वस्थता आणि नाराजी उघडपणे समोर येऊ लागलीय...पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी तर मराठवाड्यातील पराभवानंतर नेतृत्वाला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं सांगितलयं...
विधान परिषदेचा निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहे. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी पक्षाचे प्राधान्यक्रम नव्यानं ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीनं आणि कठोर आत्मपरीक्षण करावं लागेल.
दुसरीकडे संभाजीनगरमधील पराभवानंतर प्रवक्ते उमेश पाटलांनीही पटेलांच्या सुरात सुर मिसळत पक्षातील प्रमुख नेत्यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिलाय...
महायुतीत शिंदेंसेनेनं पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर दावा ठोकत सचिन सानपांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली... त्यामुळे सानप निवडून आले नसले तरी शिंदेंनी मतदारसंघावर दावा ठोकत आपली ताकद दाखवली...त्याउलट पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा दादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी अशी पक्षातील वरिष्ठांची इच्छा असतानाही पक्षनेतृत्वानं त्यासंदर्भात कुठलीच ठोस भूमिका न घेतल्यानं पक्षनेतृत्वाबाबत तटकरेंनी थेट नाराजी व्यक्त केली होती.
एकीकडे जिव्हारी लागलेला पराभव तर दुसरीकडे जागावाटपात झालेला घोळ यामुळे दादांची राष्ट्रवादी बॅकफुटला गेलीय. त्यामुळेच पक्षातील अंतर्गत वाद आता समोर येऊ लागलेत.आता आत्मपरीक्षणाची भूमिका पक्ष किती गांभीर्याने घेतो आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय ध्येयधोरणं आखतो? यावरच दादांच्या राष्ट्रवादीचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
वैदही काणेकर, ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही, मुंबई
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.