पंढरीच्या वाटेवर काळाचा घाला! ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत ट्रकने वारकऱ्यांने चिरडले, 3 महिलांचा मृत्यू; नावे आली समोर

Ashadhi Wari Jejuri Accident Latest News: जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तर 16 ते 18 जण जखमी. मृतांची नावे समोर.
Warkari pilgrims during Ashadhi Wari near Jejuri, where a tragic truck accident claimed three lives.
Warkari pilgrims during Ashadhi Wari near Jejuri, where a tragic truck accident claimed three lives.saam tv
Published On

सागर आव्हाड/ मंगेश कचरे, साम टीव्ही

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यातून वारकरी चालत पंढरपूरच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीत आज (13 जुलै) मोठी दुर्दैवी घटना घडल्याने राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. जेजूरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 16 ते 18 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे देखील समोर आली आहे.

Warkari pilgrims during Ashadhi Wari near Jejuri, where a tragic truck accident claimed three lives.
Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

जेजूरी येथील भोंगळे मळा वारकऱ्यांच्या अपघात झाला. यावेळी एका ट्रकने जवळपास 20 वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिल्याचे समजते. यामध्ये तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. हे वारकरी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत जात असताना ही घटना घडली. सदर ट्रक नांदेडचा असून मृत महिला वारकरी या सांगलीमधील होत्या. राजश्री शंकर भोसले (रा.मिरज), माधवी राजाराम सलगरे(वय 55 रा.मिरज), नंदा पवार (रा. मलकापूर) या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील आहेत. वारीसाठी ट्रक शिधा घेऊन जात होता. ट्रकचा ड्रायव्हर 63 वर्षांचा होता.

Warkari pilgrims during Ashadhi Wari near Jejuri, where a tragic truck accident claimed three lives.
Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस करत हे सगळे उपचार मोफत दिले जाणार असून मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले आहे.

आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी. जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com