रोहित कदम, साम टीव्ही
यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत जेजुरी गडावर भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली जाते. मात्र, आता याच भंडाऱ्यामुळे जेजुरीतील स्थानिक व्यापाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर भंडारा खरेदी करण्यासाठी भाविकांना सक्ती करणाऱ्यांविरोधात आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. भंडारा खरेदीसाठी सक्ती केल्यास तो खंडणीसारखा गंभीर गुन्हा मानला जाईल, असा इशाराच जेजुरी पोलिसांनी स्थानिक व्यापाऱ्यांना दिलाय. त्यामुळे जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पार्किंग आणि भंडारा सक्तीवरून भाविक आणि स्थानिकांमध्ये होणारे वाद रोखण्यासाठी प्रशासनानं हे पाऊल उचललंय. त्यामुळे आता कोणत्याही भाविकाला विशिष्ट दुकानातून भंडारा खरेदी करणं बंधनकारक असणार नाही किंवा त्यासाठी दुकानदारावर दबावही टाकता येणार नाही. . इतकंच नव्हे तर अशा प्रकारची तक्रार आली तर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे.
भाविकांना त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही दुकानातून भंडारा किंवा पूजेचे साहित्य खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार असणार आहे. पोलिस प्रशानसनाच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणार का ..आणि वर्षानुवर्षे मंदिर परिसरात सुरू असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या मनमानीला चाप बसणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.